तुम्ही तुमचा पक्ष आणि आदित्य बाळाला सांभाळा…; चित्रा वाघ यांची टीका
Admin

तुम्ही तुमचा पक्ष आणि आदित्य बाळाला सांभाळा…; चित्रा वाघ यांची टीका

वज्रमुठ सभेतून उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

वज्रमुठ सभेतून उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मुंबईतील बीकेसी मैदानावर ही सभा पार पडली. यावरुन आता भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

चित्रा वाघ यांनी ट्विट करुन लिहिले की, उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा मुंबई तोडण्याची जुनी कॅसेट वाजवायला सुरू केलीय. पण जनता सुज्ञ आहे. तुमच्या या भूलथापांना जनता भीक घालणार नाही. आणि तुम्ही म्हणजे मुंबई नाही… तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही.

तुम्ही मुंबईची काळजी करू नका… मुंबई सांभाळण्यासाठी देवेंद्र फडणवीसजी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी सक्षम आहेत. तुम्ही तुमचा पक्ष आणि आदित्य बाळाला सांभाळा… असे म्हणत चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

तुम्ही तुमचा पक्ष आणि आदित्य बाळाला सांभाळा…; चित्रा वाघ यांची टीका
उद्धव ठाकरेंच्या वज्रमुठ सभेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com