सुपारी देऊन केली हत्या; महिलेसह दोन अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल
Team Lokshahi

सुपारी देऊन केली हत्या; महिलेसह दोन अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल

वर्ध्यातील कारंजा शहरातील खर्डीपुरा परिसरातील प्रभाग क्रमांक दोन मध्ये दुपारच्या सुमारास राहत्या घरात खुनाचा थरार घडला.
Published by :
shweta walge
Published on

भूपेश बारंगे,वर्धा : वर्ध्यातील कारंजा शहरातील खर्डीपुरा परिसरातील प्रभाग क्रमांक दोन मध्ये दुपारच्या सुमारास राहत्या घरात खुनाचा थरार घडला. यात अज्ञात आरोपीने झोपेत असलेल्या इसमाची हत्या केली आहे.

मृतक रत्नाकर सावरकर वय 52 वर्ष रा.लोहरी सावंगा रहिवाशी असून सध्या कारंजा शहरात आपल्या पत्नी सोबत किरायाने राहत होता. यांचा गावातील घराशेजारी असलेल्या चाफले कुटुंबाचा जागेवरून वाद होता, या वादातून मृतकच्या कुटुंबानी आरोपी बाली उर्फ सविता चाफले यांच्या भावाची पावणे दोन वर्षांपूर्वी हत्या केली होती. या प्रकरणात मृतकसह पत्नी वडील जामिनीवर सुटले होते, त्यानंतर ते कारंजा येथे राहायला आले किरायाच्या घरात राहत होते. मृतक यांचा मुलगा गौरव सावरकर हा काल जामीनवर सुटला. याची माहिती आरोपिताना पडताच त्याला ठार करण्याची सुपारी आरोपी सविता हिने इतर आरोपींना दिली असल्याचा अंदाज पोलीस करत आहे.

गौरव सावरकर हा सुटून आल्यावर कारंजा येथे घरात झोपून असल्याचा अंदाजवरून त्याच्या वडिलांची झोपेत हत्या केली. यात त्याच्या अंगावर चार ते पाच धारदार शस्त्रने सपासप वार करत अज्ञात आरोपी पळून गेले. यात रक्तबंबाळ अवस्थेत मृतक हा जखमी अवस्थेत घराबाहेर पडताच अंगणात बेशुद्ध होऊन खाली पडताच जागीच ठार झाला असल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी बाली उर्फ सविता चाफले सह दोन अज्ञात आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक दारासिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंत गोहत्रे, लीलाधर उकंडे,अतुल अडसड, निखिल फुटाणे, उमेश खामनकर, सागर होले, खुशाल चाफले तपास करत आहे.

मुलाच्या हत्याच्या कटातून वडिलांची हत्या

गौरव सावरकर हा काल जामिनीवर सुटला. तो कारंजा येथे आला असावा अश्या अंदाजाने त्याला ठार करण्याच्या उद्देशाने आरोपी घरात शिरले, घरात अंधार असल्याने झोपलेला व्यक्ती कोण हा अंदाज न आल्याने झोपेत असलेला गौरवचे वडील रत्नाकर सावरकरवर सपासप वार करत जीवाशी ठार केले.

फूटभर जागेचा वाद ठरला हत्याकांड

लोहारीसावंगा तालुका -काटोल, जिल्हा- नागपूर येथील घरालगतच्या एका फुटाचा शुल्लक वादात दोन्ही कुटुंबात हत्याचा थरार घडला.फूटभर जागेसाठी दोन कुटुंबानी एकमेकांना ठार केले.दोन वर्षांपूर्वी हत्या केल्याच्या वादातून सुपारी देऊन हत्या केल्याची घटना प्राथमिक अंदाज केला जात आहे.

सुपारी देऊन हत्येचा केला अंदाज

रत्नाकर ह्याची हत्या न करता मुलाची हत्या करण्यासाठी सविता चाफले हिने सुपारी दिल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.ही महिला आज काटोल न्यायालयात उपस्थित असताना कारंजा येथे हत्या करण्यात आली.यावरून ही हत्या कट हा रचून करण्यात आला असावा असा अंदाज केला जात आहे.

पोलीस पथक आरोपीचा शोधात रवाना

कारंजा शहरात हत्या होताच वादातून हत्या केल्याच्या अंदाजवरून कारंजा पोलिसांनी फरार झालेल्या आरोपीच्या शोधत पथक रवाना करण्यात आला. यात पथक आरोपीचे शोध घेत असल्याचे सांगण्यात आले.

सुपारी देऊन केली हत्या; महिलेसह दोन अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल
Pune Breaking: शिवशाही बस आणि कंटेनरचा भीषण अपघात
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com