Aurangabad
Aurangabad Team Lokshahi

शिंदे गटाच्या मेळाव्याला येत असताना कार्यकर्त्यांच्या गाड्यांचा अपघात, ८ ते १० गाड्या एकमेकांना धडकल्या

दौलताबाद येथील समृद्धी महामार्गावर हा अपघात झाला असून ताफ्यातील ८ ते १० गाड्या एकमेकांना धडकल्या
Published by :
Sagar Pradhan

संपूर्ण राज्याचे लक्ष सध्या उद्याच्या शिवसेना आणि शिंदे गटाच्या मेळाव्याकडे लागले आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्या होणाऱ्या या मेळाव्यासाठी राज्यभरात कार्यकर्ते मुंबईत दाखल होत आहे. या मेळाव्याला येत असताना शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे.

Aurangabad
अनिल देशमुखांना मोठा दिलासा! 11 महिन्यानंतर जामीन मंजूर

उद्या मुंबईत मुख्यमंत्री शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी जात शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांच्या ताफ्यातील गाड्याचा अपघात झाला आहे. दौलताबाद येथील समृद्धी महामार्गावर हा अपघात झाला असून ताफ्यातील ८ ते १० गाड्या एकमेकांना धडकल्या असल्याची माहिती मिळत आहे.

Aurangabad
अंधेरी पोटनिवडणुकीत काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा? थोरातांनी स्पष्ट केली भूमिका

परवानगी नसतांना समृद्धी महामार्गावरून गाड्या नेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या अपघातामध्ये गाड्यांचे थोडेफार नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, गाड्यामधे असलेल्यांना दुखापत झाली का नाही याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. शिंदे गटाचे उपनेते अर्जुन खोतकर यांच्या ताफ्यातील या गाड्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com