फडणवीसांच्या घराला आंदोलनकर्त्यांचा घेराव, पोलिसांनी घेतले ताब्यात

फडणवीसांच्या घराला आंदोलनकर्त्यांचा घेराव, पोलिसांनी घेतले ताब्यात

विदर्भवादी आपल्या मागण्यासाठी आज नागपूरमध्ये आक्रमक झाले आहे. आपल्या मागण्यांना घेऊन उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घ
Published by :
shweta walge

विदर्भवादी आपल्या मागण्यासाठी आज नागपूरमध्ये आक्रमक झाले आहे. आपल्या मागण्यांना घेऊन उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराचा घेराव करण्यासाठी संविधान चौक येथून लॉंग मार्च काढला पण पोलिसांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराच्या अर्धा किलोमीटर आधीच विदर्भवाद्यांना बॅरिगेट लावून अडवून धरलं आणि त्यानंतर विदर्भवादी आक्रमक झाली आणि त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

महावितरण कंपनी द्वारे एप्रिल महिन्यापासून 37 % टक्के वीज बिलात दरवाढ केली आहे. यामुळे सामान्य वीज ग्राहक होरपळल्या जात आहे, ही दरवाढ विदर्भ राज्य आंदोलन समितीला अमान्य असून, वीज ग्राहकांच्या हक्काकरता व वीज दरवाढ विरोधात, कोराडी येथे प्रदूषण पसरवणारे नवीन वीज संयंत्र उभारणीच्या विरोधात, तसेच स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणी करता विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे आज तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले.

फडणवीसांच्या घराला आंदोलनकर्त्यांचा घेराव, पोलिसांनी घेतले ताब्यात
'भाजपवर विश्वास ठेवू नका' 'त्या' बैठकीबाबत शरद पवारांचा मोठा खुलासा

दरम्यान, पोलिसांनी फडणवीस यांच्या निवासस्थानाबाहेर बॅरिकेड्स लावत परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला. पण तरीही आंदोलकांनी फडणवीसांच्या घराकडे जाण्याचा प्रयत्न केला असता काही आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com