उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापुजा संपन्न

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापुजा संपन्न

महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी वारीनिमित्त शासकीय महापूजा पार पडली.
Published by :
Siddhi Naringrekar

महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी वारीनिमित्त शासकीय महापूजा पार पडली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यंदा औरंगाबादच्या साळुंखे दाम्पत्याला उपमुख्यमंत्र्याबरोबर शासकीय पूजा करण्याचा मान मिळाला. आषाढी आणि कार्तिकी या दोनही महापूजेचा मान मिळवणारे फडणवीस हे पहिजे राजकारणी ठरले आहेत.

पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी उपमुख्यमंत्र्यांचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आगमन झालं. विठ्ठलाच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला त्यानंतर मंत्रोपचारामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सपत्निक पूजा करण्यात आली. गेली ५० वर्षे वारी करणाऱ्या माधवराव साळुंखे आणि कलावती माधवराव साळुंखे या दाम्पत्याला उपमुख्यमंत्र्यांबरोबर पूजा करण्याचा मान मिळाला आहे.

आषाढी आणि कार्तिकीची पूजा करायला मिळाली ही पांडूरगांची कृपा, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.अडीच वर्षानंतर राज्यात सत्तापालट झाली आणि एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली. तर, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. यंदाच्या आषाढीला श्री. विठ्ठलाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यानंतर आता कार्तिकीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सपत्निक शासकीय महापूजा केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com