DHFL प्रकरणात सीबीआयची कारवाई; अविनाश भोसलेंच्या घरातून कोट्यवधींचं हेलिकॉप्टर जप्त

DHFL प्रकरणात सीबीआयची कारवाई; अविनाश भोसलेंच्या घरातून कोट्यवधींचं हेलिकॉप्टर जप्त

या प्रकरणात आणखी काही गोष्टी समोर येणार असल्याच्या निर्माण झाल्या आहेत.
Published by :
Team Lokshahi

डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने बिल्डर अविनाश भोसले यांच्या घरातून कोट्यवधींचे हेलिकॉप्टर जप्त केलं आहे. पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांना सीबीआयने काही दिवसांपूर्वी ताब्यात घेतलं होतं. ईडीने त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या मालमत्तांची चौकशी केली होती. आता त्यांच्या घरातून थेट हेलिकॉप्टर जप्त करण्यात आल्यानं या प्रकरणात आणखी काही गोष्टी समोर येणार असल्याच्या निर्माण झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून येस बँक आणि दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या (DHFL) घोटाळ्याप्रकरणी अविनाश भोसले सीबीआयच्या रडारवर होते. सीबीआयने अविनाश भोसले यांना 26 मे रोजी पुण्यातून अटक केली होती. त्यानंतर मुंबईतील सीबीआय कोर्टात त्यांना 27 मे रोजी हजर करण्यात आले होते.

DHFL प्रकरणात सीबीआयची कारवाई; अविनाश भोसलेंच्या घरातून कोट्यवधींचं हेलिकॉप्टर जप्त
दौरा अर्धवट सोडून CM शिंदे दिल्लीला रवाना

याआधीही फेमा कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी अविनाश भोसले यांची नोव्हेंबर महिन्यात मुंबईत 2 वेळा ईडीने चौकशी केली होती. तसेच, पुण्यात एबीआयएलया विद्यापीठ रस्त्यावरच्या भोसले यांच्या कार्यालयात ईडीने छापा टाकला होता. याशिवाय फेमा कायद्याअंतर्गत ईडीने भोसले यांची पुणे आणि नागपुरातील मालमत्ता जप्त केली होती. या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत ईडीने भोसले यांची 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com