ठाकरे गटाला धक्का; दिपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार, म्हणाल्या...

ठाकरे गटाला धक्का; दिपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार, म्हणाल्या...

दिपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.

दिपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. लवकरच माझा शिंदे गटात प्रवेश होणार असल्याचे अभिनेत्री दिपाली सय्यद हिने सांगितले. दिपाली सय्यद यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. माध्यमांशी बोलताना दिपाली सय्यद म्हणाल्या की, शनिवारपर्यंत शिंदे गटात प्रवेश करणार. मुख्यमंत्र्यांसोबत भेट झाली. मुख्यमंत्री देतील ती जबाबदारी मी स्वीकारणार. प्रवेशाबाबत मी आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. राजकारणात प्रत्येकजण आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी येत असतो. पण जर काही कारणांमुळे पक्ष फुटत असेल तर मग आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी, काम कऱण्यासाठी असे निर्णय घ्यावे लागतात. ज्या व्यक्तीला पाठिंबा दिला पाहिजे त्यांच्यासोबत गेलं पाहिजे,” “खोके म्हटलं जात आहे, त्यामागील खरं राजकारण समोर आलं पाहिजे. तसंच मुंबई महापालिके नेमकी कोणाच्या ताब्यात आहे हेदेखील कळलं पाहिजे,” असे दिपाली सय्यद यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

यासोबतच “संजय राऊतांना आपल्या पापाची शिक्षा झाली. पक्ष तोंडाने कसा फोडला जाऊ शकतो याचं ते उत्तम उदाहरण आहे. त्याच्यामुळे या गोष्टी घडत गेल्या असून दोन वेगळे गट झाले आहेत. एकनाथ शिंदेंनीच मला शिवसेनेत आणलं असल्याने त्यांच्यासोबत उभं राहणं माझं कर्तव्य आहे”. “रश्मी ठाकरेंना मुंबई महापालिकेतील खोके ‘मातोश्री’वर येणं बंद झाल्याची मोठी खंत आहे. निलम गोऱ्हे, सुषमा अंधारे या चिल्लर आहेत. रश्मी ठाकरे खऱ्या सूत्रधार आहेत,” असा आरोप दिपाली सय्यद यांनी रश्मी ठाकरेंवर केला आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com