BCCI Strict Guidelines  : बंगळूरच्या 'त्या' घटनेनंतर BCCI चा मोठा निर्णय
BCCI Strict Guidelines : बंगळूरच्या 'त्या' घटनेनंतर BCCI चा मोठा निर्णयBCCI Strict Guidelines : बंगळूरच्या 'त्या' घटनेनंतर BCCI चा मोठा निर्णय

BCCI Strict Guidelines : बंगळूरच्या 'त्या' घटनेनंतर BCCI चा मोठा निर्णय

BCCI निर्णय: RCB सेलिब्रेशन दुर्घटनेनंतर नवे नियम, सुरक्षिततेला प्राधान्य.
Published by :
Team Lokshahi
Published on

आयपीएल 2025 च्या 18व्या हंगामात RCB संघाने पहिली ट्रॉफी जिंकत 17 वर्षांचा प्रतीक्षा संपवली. 3 जून रोजी अहमदाबादमध्ये पंजाब किंग्जला हरवून त्यांनी विजय मिळवला. 4 जूनला बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर RCB संघाच्या सेलिब्रेशन दरम्यान मोठी गर्दी उसळली आणि चेंगराचेंगरीत 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर BCCI ने कडक पावले उचलली असून विजयानंतरच्या सेलिब्रेशनसाठी नवी नियमावली तयार केली आहे. या निर्णयामुळे भविष्यातील सेलिब्रेशनमध्ये सुरक्षिततेला प्राधान्य दिलं जाणार आहे.

BCCI कडून नव्या नियमावलीत मुख्य मुद्दे पुढीलप्रमाणे:

1. विजयानंतर तात्काळ सेलिब्रेशन नाही – ट्रॉफी जिंकल्यानंतर 3-4 दिवसांच्या आत कोणत्याही सेलिब्रेशन कार्यक्रमाचे आयोजन करता येणार नाही.

2. घाईगडबड टाळणार, कोणत्याही सेलिब्रेशनसाठी तात्काळ परवानगी नाकारली जाणार आहे.

3. बीसीसीआयची लेखी परवानगी बंधनकारक कोणताही कार्यक्रम पूर्व मंजुरी घेऊनच करता येणार आहे.

4. सुरक्षेचे 4-5 टप्पे आवश्यक कार्यक्रमस्थळी बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था बंधनकारक असणार आहे.

5. प्रवासादरम्यानही सुरक्षा आवश्यक विमानतळापासून कार्यक्रमापर्यंत सुरक्षा अनिवार्य आहे.

6. खेळाडूंना पूर्ण संरक्षण प्रत्येक टप्प्यावर खेळाडू आणि स्टाफसाठी सुरक्षेची खात्री केली जाईल.

7. स्थानीक प्रशासनाची परवानगी जिल्हा पोलिस, राज्य सरकार व कायदा अंमलबजावणी संस्थांची मंजुरी आवश्यक आहे.

या नव्या नियमावलीचा उद्देश म्हणजे कोणताही विजयी सोहळा अधिक सुरक्षित, नियोजित आणि नियंत्रित पद्धतीने पार पडावा. बीसीसीआयचा हा निर्णय भविष्यातील संभाव्य अपघात टाळण्यासाठी महत्त्वाचा ठरणार असून खेळाडू, कर्मचारी आणि चाहत्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिलं जाणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com