डॉ.पूर्वप्रभा पाटील या कोकणकन्येने केले  इजिप्तमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

डॉ.पूर्वप्रभा पाटील या कोकणकन्येने केले  इजिप्तमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

जागतिक आरोग्य संघटनेच्या संचालक डॉ. मारिया नीरा यांची ही घेतली भेट

निसार शेख, चिपळूण : रत्नागिरी कोकणातील डॉ.पूर्वप्रभा पाटील United Nations Climate Change Conference 2022 मध्ये प्रतिनिधीत्व करत आहे. बदलत्या हवामानाचा भारतीय आरोग्यावर होतो. परिणाम या विषयी इजिप्त येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेत COP27 मधे प्रतिनिधित्व केल्याची अभिमानास्पद कामगिरी केली आहे.

रत्नागिरी शहरातील मधील सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. राधारानी पाटील यांची कन्या आणि आम आदमी पार्टी रत्नागिरीच्या जिल्हा संयोजक श्री. ज्योतिप्रभा पाटील यांची बहिण, डॉ.पूर्वप्रभा पाटील यांनी या वर्षी इजिप्तमध्ये आयोजित संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेत COP27 मध्ये प्रतिनिधित्व केले आहे..

डॉ.पूर्वप्रभा यांनी हवामान बदलामुळे भारतातील आरोग्यसेवेवर कसा परिणाम होत आहे यासंबंधी विविध मुद्दे उपस्थित केले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या (World Health Organization) सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माननीय संचालक डॉ. मारिया नीरा यांची परिषदेत भेट घेतली.

डॉ.पूर्वप्रभा यांनी यापूर्वी संयुक्त राष्ट्र महासभा (United Nations General Assembly) आणि जागतिक आरोग्य संघटनेत प्रतिनिधी म्हणूनही बोललेली आहे, आणि लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिनमधून सार्वजनिक आरोग्यामध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. आणि सध्या पोस्ट ग्रॅज्युएट वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या डॉक्टर आहेत. 

डॉ.पूर्वप्रभा पाटील या कोकणकन्येने केले  इजिप्तमध्ये भारताचे प्रतिनिधित्व
चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात आम आदमी पार्टी कडून निषेध व्यक्त करत आंदोलन

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com