Drone attack may occur in MumbaiTeam Lokshahi
मुंबई शहर हे देशाची आर्थिक राजधानी. मुंबईमध्ये नागरिकांसह पर्यटकांचीही मोठी रेलचेल असते. याच कारणांमुळे देशामध्ये मुंबईचं महत्त्व मोठं आहे. त्यामुळे, मुंबई शहर हे नेहमीच दहसतवाद्यांच्या टार्गेट लिस्टमध्ये सर्वात वर असतं. आता मुंबईवर ड्रोन हल्ल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच पार्श्वभुमीवर विशेष काळजीही घेतली जात आहे.
मुंबईत ड्रोन, पॅराग्लायडिंग आणि इतर हवेत उडणाऱ्या यंत्रांना बंदी आहे. ही नियमित ऑर्डर आज पुन्हा एकदा जारी करण्यात आलीय. मुंबई पोलिसांनी जारी केलेली ड्रोनबंदी ऑर्डर ही रुटीन ऑर्डर असल्याची पोलिसांची माहिती पोलिसांनी दिलीय.
ड्रोन किंवा इतर हवेत उडणाऱ्या यंत्रांचा आणि साहित्याचा वापर करून हल्ले होऊ शकतात, व्हीआयपींना टार्गेट केलं जाऊ शकतं. ही शक्यता लक्षात घेता प्रतिबंधात्मक आदेश दिले आहेत.