Buldhana Accident
Buldhana AccidentTeam Lokshahi

Buldhana Accident : दारूच्या नशेत पोलिसाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं; 3 वाहनांना धडक

भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून या पोलीस कर्मचाऱ्याने तीन वाहनांला धडक दिली. हा पोलीस कर्मचारी खामगाव येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशनचा आहे.

संदीप शुक्ला : बुलढाणा | बुलढाण्यात एक विचित्र अपघात झाल्याची घटना घडली आहे. एका मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याच्या वाहनाचा अपघात झाला. या वाहनाने तीन वाहनांना धडक दिल्याची घटना उघडकीस आली आहे.

Buldhana Accident
VIDEO : गंगापूर मार्गावर दोन कारची समोरासमोर धडक; भीषण अपघात 4 जणांचा मृत्यू

भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून या पोलीस कर्मचाऱ्याने तीन वाहनांला धडक दिल्याची घटना घडली आहे. हा पोलीस कर्मचारी खामगाव येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वाहनांचे नुकसान झाले आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com