Admin
बातम्या
एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस, आवडते मुख्यमंत्री कोण? राज ठाकरे यांनी स्पष्ट सांगितले...
ही मुलाखत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी घेतली.
‘लोकमत’च्या पुरस्कार सोहळ्यात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत पार पडली. विशेष म्हणजे ही मुलाखत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी घेतली.
यावेळी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापैकी आवडते मुख्यमंत्री कोण? असा प्रश्न विचारला
यावर उत्तर देत राज ठाकरे म्हणाले की, एकनाथ शिंदे हे आताच मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांना मुख्यंमत्री म्हणून ठसा उमटवायचा आहे.मी रितेश इथे बसलाय म्हणून बोलत नाहीय. प्रभावशाली मुख्यमंत्री म्हणून मी पाहिले असतील तर ते दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते. देवेंद्र फडणवीस आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. मनोहर जोशी , नारायण राणे असे राज ठाकरे म्हणाले.