फडणवीसांची ओबीसी आंदोलकांना भेट, दिले 'हे' आश्वासन
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरात ओबीसी आंदोलकांची जाऊन भेट घेतली. या दरम्यान त्यांनीओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही असं आश्वासन दिलं आहे. नागपुरात ओबीसी समाजाचं गेल्या 7 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्रे देण्यास ओबीसींचा विरोध आहे. तर कुणबी ओबीसी महासंघातर्फे बेमुदत धरणे आंदोलन केलं जात आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
नगरच्या उपोषणकर्त्यांची गेल्या पाच-सहा दिवसापासून नागपूरमध्ये आंदोलन सुरू आहे. चंद्रपूर, मराठवाड्यामध्ये देखील सुरू आहे. मी आज त्या ठिकाणी त्यांना भेट दिली आणि त्यांना सांगितलं की उपोषण मागे घ्यावा. मी सांगतो आहे की, ओबीसीचे आरक्षण कमी होणार नाही किंवा कुणालाही घेऊ देणार नाही. आणि ओबीसींच्या आरक्षणामध्ये कोणतीही अडचण राज्य सरकारच्या वतीने निर्माण होऊ देणार नाही. आम्ही आता क्युरी टू पिटिशनचं काम सुरू केला आहे. मुळातच सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी जो काही निर्णय दिला आहे. त्या निर्णयाच्या संदर्भात आम्ही भोसले कमिटीचे निर्माण केलं असल्याचं ते म्हणाले आहेत.
न्यायमूर्ती भोसले यांनी काही उपाययोजना सांगितले आहे, की ज्या आधारावर तो रिपोर्ट रद्द झाला. त्या उपाययोजना केल्या तर तो रिपोर्ट सर्वोच्च न्यायालयामध्ये ग्राह्य होऊ शकतो. त्या उपाययोजना आम्ही सुरू केल्या आहेत ते जे काही आरक्षण ओबीसी पेक्षा वेगळा मराठा समाजाला दिलं होतं ते पुन्हा मराठा समाजाला कसा मिळेल अशा प्रकारचा आपला प्रयत्न निश्चितपणे त्या ठिकाणी आहे.
जरांगे पाटील यांनी जी मागणी होती सरसकट तो शब्द टाकता येणार नाही कारण कोर्टामध्ये ते टिकले पाहिजे. एक समाजाविरुद्ध दुसऱ्या समाजाचा परिस्थितीचा महाराष्ट्र मध्ये उभी राहिल्या. तर महाराष्ट्राचा सोशल फॅब्रिक आहे ते देखील अडचणीत येईल त्यामुळे मी या माध्यमातून ओबीसी समाजाला या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो. सरकार ओबीसीचा कुठे आरक्षण कमी करणे किंवा त्यांना दुसऱ्यांना देणार असा कोणताही निर्णय सरकार देणार नाही आणि मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात घोषणा केली आहे. असं ते म्हणाले आहेत.
मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं या मागणीच्या विरोधात नागपूरच्या संविधान चौकामध्ये गेल्या सात दिवसापासून सर्व शाखीय कुणबी ओबीसी कृती महासंघातर्फे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री यांनी जरांगे पाटील यांना भेट देऊन उपोषण मागे घ्यायला लावलं आणि आश्वासन दिल. त्यानंतर ओबीसी आणि कुणबी समाज आक्रमक झालेला आहे. आणि आमच्याही आंदोलन स्थळावरती भेट द्यावी आणि आमच्या मागण्या संदर्भात चर्चा करावी ही मागणी केली. सोबतच सरकारने लिहून द्यावे की मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार नाही. त्यांनतर आज दुपारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आंदोलनस्थळी भेट देऊन गेले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देखील आंदोलनाला भेट देऊन गेले. आणि आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आंदोलन स्थळी पोहोचले आहेत ..आणि ओबीसी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत आहे