गुजरातच्या भाजपा उमेदवारांची पहिली यादी आज येणार, हार्दिक पटेल यांना मिळू शकते तिकीट

गुजरातच्या भाजपा उमेदवारांची पहिली यादी आज येणार, हार्दिक पटेल यांना मिळू शकते तिकीट

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने गुजरातमधील 110 उमेदवारांच्या नावांना मंजुरी दिली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने गुजरातमधील 110 उमेदवारांच्या नावांना मंजुरी दिली आहे. बुधवारी सायंकाळी दिल्लीत झालेल्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत या नावांवर एकमत झाले. भाजप आज या उमेदवारांची नावे जाहीर करणार आहे. या यादीत मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, हार्दिक पटेल आणि काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेले अल्पेश ठाकोर आणि क्रिकेटर रवींद्र जडेजाच्या पत्नी रिवाबा जडेजांचे नाव असू शकते, असे समजते. भाजप आपल्या काही आमदारांची तिकिटेही कापू शकतो. भाजपच्या या यादीत काही युवा चेहऱ्यांचाही समावेश होऊ शकतो. आज सकाळी १० वाजता उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे.

भाजपच्या या यादीत मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचेही नाव आहे. घाटलोडिया मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या हार्दिक पटेलला अहमदाबादमधील विरमगाम आणि राधानपूरमधून आमदार अल्पेश ठाकोरला तिकीट मिळू शकते. क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा यांनाही भाजप विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवू शकते. या फीडबॅकच्या आधारे भाजपने आपल्या काही आमदारांची तिकिटे कापण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. भाजपच्या पहिल्या यादीत काही युवा चेहरेही दिसू शकतात. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बुधवारी सायंकाळी बैठक झाली. यामध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने आपल्या उमेदवारांची नावे निश्चित करण्यावर विचारमंथन केले. भाजपच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि इतर नेते उपस्थित होते.

आज येणार्‍या यादीत मोरबीतील भाजपचे माजी आमदार कांतीलाल अमृत यांचेही नाव असू शकते. गुजरातमध्ये सलग सातव्यांदा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपची तयारी सुरू आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी १ आणि ५ डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. गुजरात विधानसभेत एकूण 182 जागा आहेत. बहुमतासाठी 92 जागांची आवश्यकता आहे. तेथे 2017 च्या निवडणुकीत भाजपने एकूण 99 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसच्या खात्यात 77 जागा गेल्या. इतर पक्ष आणि अपक्षांनी सहा जागा जिंकल्या होत्या. पोटनिवडणुकीनंतर गुजरात विधानसभेत सध्या भाजपचे १११, काँग्रेसचे ६२, भारतीय आदिवासी पक्षाचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेसचे एक आणि एक अपक्ष सदस्य आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com