Collector's Office
Collector's OfficeTeam Lokshahi

वर्ध्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातच मास्कचा विसर! जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली

वर्ध्यात आज कोरोना रुग्ण आढळला

भूपेश बारंगे,वर्धा: कोरोना विषाणूचा शिरकाव देशासह राज्यात होण्याची शक्यता वर्तवली जात असताना कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी मास्कचा वापर अनिवार्य करण्यासाठी 26 डिसेंबर रोजी आदेश काढण्यात आला. या आदेशाचे सर्वांनी पालन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले. मात्र या आदेशाला जिल्हाधिकारीसह जिल्हाधिकारी कार्यालयातच विसर पडलेला दिसून आला. शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी अधिकारी यांची या आदेशाला केराची टोपली दाखवली जात असल्याचे दिसून आले आहे.

जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी शासकीय, निमशासकीय व आस्थापना मधील कर्मचारी, अधिकारी व भेट देणाऱ्यांनी मास्कचा वापर करून कार्यालयात प्रवेश करावा असे निर्देश देण्यात आले आहे. मात्र या आदेशाची कार्यलयातच पायमल्ली होताना दिसत आहे. नुकताच वाशीम जिल्ह्यात नवा कोरोना रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली असता. वर्धा जिल्ह्यात मात्र मास्क विसर पडला आहे. वर्ध्यात मराठी साहित्य संमेलनाचे आयोजित केले आहे. त्यासाठी नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांकडून त्या जागेवर भूमिपूजन केले आहे. मात्र यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी मास्क न घालता भूमिपूजन केल्याचे छायाचित्रा मध्ये दिसत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारीच मास्क वापर करत नसल्याने या आदेशाचे पालन कोण करणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. बोटावर मोजण्या एवढे काही कर्मचारी सोडले तर कोणीही मास्क वापर करताना दिसत नाही आहे.

जिल्हाधिकारी यांनी सर्वसामान्य करीता मास्कचा वापर करावा असे अनिवार्य निर्देश काढून स्वतः त्याची पायमल्ली करत असेल तर हा आदेश फक्त शासनाला दिखावा करण्यासाठी तर आदेश काढला नाही ना असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. आदेश काढून मोकळं होणं हेच या प्रकारातून दिसत आहे.

Collector's Office
अमृता फडणवीसांचा जलवा! नव्या गाण्याला काही तासांतच लाखो व्हयूज

साहेब...आपल्या आदेशाची स्वतःकडूनच पायमल्ली

जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी कोरोनाचा शिरकाव रोखण्यासाठी मास्क वापर करण्याचा अनिवार्य आदेश काढून स्वतः मास्कचा वापर करत नसल्याने त्या आदेशाची पायमल्ली करत असेल तर हा आदेश कोणासाठी काढला असावा असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे. जिल्ह्यातील कोणत्याही शासकीय ,निमशासकीय या आदेशाचे पालन होताना दिसत नाही आहे.जिल्हाधिकारी,जिल्हा परिषद, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा कृषी कार्यालय, पोलीस कार्यालय, सार्वजनिक बांधकाम, ग्रामीण रुग्णालय, पोस्ट ऑफिस, उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय यासह इतर कार्यालयात या आदेशाला हुलकावणी दिल्याचे दिसून येत आहे. या आदेशाच विसर पडला असेल तर हा आदेश परत घेण्याचा निर्णय घ्यावा तर लागणार नाही ना? असे नागरिक चर्चा करताना दिसत आहे.

जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळला

वर्धा जिल्ह्यात आज एक कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती सांगण्यात आली असून हा रुग्ण कुठे आढळला याबाबत माहिती मिळाली नाही.जिल्हा माहिती विभागाकडून कोरोना रुग्ण आढळल्याचे माहिती दिली आहे.त्यामुळे मास्कच्या आदेशाचे पालन आतातरी होणार का?.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com