माजी आमदारांची पक्ष वाढीसाठी कार्यकर्त्यांची जुळवाजुळव
Team Lokshahi

माजी आमदारांची पक्ष वाढीसाठी कार्यकर्त्यांची जुळवाजुळव

आर्वी मतदार संघात पक्ष प्रवेशाचा सोहळा,भव्य कार्यकर्त्यांचा मेळावा

भूपेश बारंगे,वर्धा : जिल्ह्यातील आर्वी मतदार संघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. मात्र कालांतराने हा गड ढासळत गेला आणि कासवाच्या गतीने येणारे दादाराव केचे कधीकाळी आमदार होऊन गेले हे कोणालाही कळलेच नाही. त्यानंतर माजी आमदार अमर काळे यांच्या पाया खालची वाळू सरकली. त्यामुळे आता काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी माजी आमदार अमर काळे धडपड करताना दिसत आहे. 9 जानेवारीला तळेगांव श्यामजीपंत येथे भव्य युवक मेळावा व पक्ष प्रवेश सोहळा कार्यक्रम आयोजित केला आहे. यात आमदार विकास ठाकरे व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष तणवीर अहमद विद्रोही या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. हा कार्यक्रम माजी आमदार अमर काळे यांनी आयोजित केला आहे. ही काळाची गरज असल्याचे यातून दिसत आहे. त्यामुळे पक्ष वाढीसाठी प्रयत्न केला जात आहे.

ससा आणि कासवाची गोष्ट आपण ऐकली आहे. अशीच गोष्ट म्हणावं लागेल ती आर्वी मतदारसंघात घडली आहे. स्वर्गीय आमदार शरद काळे यांचा काहीवेळा निसटता विजय त्यांनी बघितला आहे. तरीही त्यांनी आपलं गड या मतदारसंघात कायम ठेवला होता. त्यानंतर त्यांच्या निधनानंतर त्यांचे वारसदार अमर काळे यांनी या आर्वी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी घेऊन त्यांना वडिलांची सहानुभूती मिळत राहिल्याने पहिल्यांदाच त्यांना 25 हजार मताधिक्याने विजय मिळवला होता आणि या मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडुन आले होते. एवढ्या मतांनी त्यांचा विजय झाल्यामुळे त्यांचा विजय रथ या मतदारसंघात कोणीच आता थांबवू शकत नसल्याचे चित्र येथील राजकीय लोक सांगत असायचे.मात्र या मतदारसंघात काँग्रेस रथाचे एकदा नाही तर दोनदा रथ थांबला गेला तोही कोणाला न कळत या मतदारसंघात भाजपचे 2009 मध्ये कासव गतीने येत कमळ फुलवला. हा विजय जिल्ह्यातील भाजपचा पहिला होता,हे तेवढंच खरं!

आर्वी मतदार संघात काँग्रेस गड बघता सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे मात्र दुर्लक्ष होत गेलं.या मतदारसंघात कोणीच आपल्याला पराभूत करू शकत नाही याचं तोऱ्यात राहिल्याने हा गड ढासळत गेला, अन 2019 मध्ये भाजपला तेरा हजारापेक्षा मताने विजय मिळवला. आर्वी मतदार संघात काँग्रेसचा बोलबाला असताना तिन्ही तालुक्यात कुठेही काँग्रेस पक्षाचे कार्यालय सर्व सामान्य नागरिकांसाठी उघडण्यात आले नाही.त्यामुळे नागरिकांचा दुरावा वाढत गेला.आणि काँग्रेस पक्षातील नेते कार्यकर्ते भाजपकडे वळू लागले.यामुळे आर्वी मतदारसंघात दोनदा काँग्रेसचा पराभव झाला.हा पराभव आता मात्र पायाखालची वाळू सरकवत असल्याने पक्ष वाढवण्यासाठी जाग येऊ लागल्याचे दिसून येत आहे. माजी आमदार अमर काळे आता अनेक मोर्चात सहभागी होताना दिसत आहे .त्यामुळे येणाऱ्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत हा गड पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मात्र अजूनही तसेच आहेत.कारंजा शहरात कॉंग्रेस पक्षाची सत्ता असताना या शहराच्या उशाला धरण आहे मात्र येथील नागरिकांच्या घशाला कोरड आहे.याकडे मात्र लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करताना दिसत आहे.पावसाळ्यातही या शहरात आठवड्यातुन एकदा पाणी पुरवठा केला जातो. महाविकास आघाडी सरकारच राज्यात अडीच वर्षे सत्ता होती. तत्कालीन पालकमंत्री सुनिल केदार यांच्या मदतीने येथील पाणीपुरवठा योजना जी अनेक वर्षांपासून रखडलेली आहे. ती पूर्णत्वास नेण्याचे काम करायला पाहिजे होते असे सर्वसामान्य नागरिक सोबत त्यांच्या पक्षातील नेते बोलताना दिसत आहे. छोटे छोटे प्रश्न जर काँग्रेस सरकारच्या काळात सुटले असते तर ही परिस्थिती आज ओढवली नसती हे पण तेवढंच खरं आहे. आज आर्वी मतदारांसंघातच नाही तर जिल्ह्यात काँग्रेसची परिस्थिती बिकट झाली आहे.आता या पक्षात चटई उचलण्यासाठी कार्यकर्ते दिसून येत नाही.

माजी आमदारांची पक्ष वाढीसाठी कार्यकर्त्यांची जुळवाजुळव
'अशा ५६ नोटिसा आल्या...' चाकणकरांवर चित्रा वाघांचा पलटवार

भव्य कार्यकर्ता मेळावा किंवा पक्ष प्रवेश केल्याने पक्षाचं महत्व जरी वाढत असलं तरी मात्र पक्षाला संजीवनी देण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांचे छोटेमोठे प्रश्न त्यासोबत सोडवावे लागणार आहे. आर्वी मतदारसंघात अनेक प्रश्न आजही जैसेथे आहे.कारंजा तालुक्यातील 60 टक्के भाग हा जंगलव्याप्त आहे.त्यामुळे या भागातील शेतकरी वन्यप्राण्यांच्या हैदोषामुळे त्रस्त आहेत.तर काही शेतकऱ्यांना हिसंक प्राण्यांच्या हल्ल्यात जीव गमवावा लागला आहे.असेच अनेक प्रश्न आष्टी तालुक्यातील आहे.याच सोबत आर्वीतही तीच परिस्थिती असल्याचे नागरिक सांगत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com