किर्तीकर पिता-पुत्रांमध्ये मतभेद? वडील शिंदे गटात, पण मुलगा अजूनही उद्धव ठाकरेंसोबतच

किर्तीकर पिता-पुत्रांमध्ये मतभेद? वडील शिंदे गटात, पण मुलगा अजूनही उद्धव ठाकरेंसोबतच

राज्यात शिवसेना आणि शिंदे गटात जोरदार वाद सुरु असताना, दुसरीकडे मात्र, शिवसेनेतील गळती काही थांबण्याचे नाव घेत नाहीय.

राज्यात शिवसेना आणि शिंदे गटात जोरदार वाद सुरु असताना, दुसरीकडे मात्र, शिवसेनेतील गळती काही थांबण्याचे नाव घेत नाहीय. मुंबईतून शिवसेना नेते आणि खासदार गजानन किर्तीकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेना(ठाकरे गटाला) मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर लगेचच हा प्रवेश झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने किर्तीकर यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेते पदावरून हक्कालपट्टी करण्यात आली आहे.

“मुलाला मी काही बंधन घातलेलं नाही. त्याला मी काही करायला सांगितलेलं नाही. तो शिवसेनेत काम करायला लागला ते स्वत:च्या मर्जीनं. त्याच्यात आणि माझ्यात कुठला वादही नाही. मी त्याला म्हटलं मला जायचंय. हे काही मला सहन होत नाहीये. ही शिवसेना वेगळ्या पद्धतीने चाललीये. शिवसेनेत हा बदल झाला. उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीची सोबत घेतली. हिंदुत्ववाद सोडला. जर त्यांनी भाजपाची सोबत पुन्हा केली तर मला त्या शिवसेनेसोबत राहायचंय. नसेल, तर मला जायचंय” असं गजानन किर्तीकर म्हणाले.

मुंबईतून शिवसेना नेते आणि खासदार गजानन किर्तीकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला मात्र त्यांचा मुलगा अमोल किर्तीकर उद्धव ठाकरेंसोबत राहण्यावर ठाम असल्याची माहिती मिळत आहे. नुकतीच अमोल किर्तीकर यांची शिवसेना उपनेतेपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com