Pandharpur
PandharpurTeam Lokshahi

भटूंबरे गावात पत्र्याच्या खोलीतून एक लाखाची गोवा दारु जप्त, आरोपी फरार

नविन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गोवा राज्यातील दारुच्या अवैधरीत्या होणा-या तस्करीवर करडी नजर ठेवण्यात येत असून
Published by :
shweta walge
Published on

अभिराज उबाळे, पंढरपूर :- नविन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गोवा राज्यातील दारुच्या अवैधरीत्या होणा-या तस्करीवर करडी नजर ठेवण्यात येत असून शुक्रवारी (ता. 30 डिसेंबर) पंढरपूर तालुक्यातील भटूंबरे गावाच्या हद्दीत एका पत्र्याच्या खोलीतून 1 लाख किंमतीची गोवा बनावटीची विदेशी दारु जप्त केली आहे.

सविस्तर वृत्त असे की, नविन वर्षाच्या निमित्याने अवैध व बनावट दारुला प्रतिबंध घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून धडक कारवाई करण्यात येत असून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पंढरपूर विभागाचे निरिक्षक पवन मुळे यांनी त्यांच्या पथकासह 30 डिसेंबर शुक्रवारी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास पंढरपूर-शेटफळ रोडच्या कडेला असलेल्या भटूंबरे गावाच्या हद्दीत एका पत्र्याच्या खोलीतून नविन वर्षाच्या अनुषंगाने अवैधरीत्या विक्रीकरीता साठवून ठेवलेली 1 लाख तीन हजार किंमतीची गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेली विदेशी दारु जप्त केली आहे. यात एड्रियल व्हिस्कीच्या 750 मिलीच्या 120 बाटल्या, मॅकडॊवेल नंबर 1 व्हिस्कीच्या 180 मिलीच्या 90 बाटल्या, इंपेरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या 180 मिलीच्या 90 बाटल्या व रॊयल स्टॅग व्हिस्कीच्या 180 मिलीच्या 52 बाटल्या असा मुद्देमाल जप्त केला असून गुन्ह्यातील आरोपी हा फरार असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

Pandharpur
वर्ध्यात नववर्षाच्या पूर्वसंध्येला लाखोंचा दारूसाठा जप्त

ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक व उप अधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक पवन मुळे, दुय्यम निरिक्षक अंकुश आवताडे, कैलास छत्रे, मानसी वाघ, सहायक दुय्यम निरिक्षक जीवन मुंढे, जवान गणेश रोडे, अनिल पांढरे , तानाजी काळे, प्रशांत इंगोले यांच्या पथकाने पार पाडली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com