Measles Outbreak in Maharashtra​
Measles Outbreak in Maharashtra​ Team Lokshahi

Measles Outbreak : महाराष्ट्रात गोवरचा कहर, मुंबईत तब्बल 8 बालकांचा मृत्यू

गेली दोन वर्षाहून अधिक काळ राज्यासह देशात कोरोनाने धुमाकूळ घातला. आता कोठेतरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असता राज्यात गोवर आजाराचा संसर्ग मोठ्या वेगाने पसरत असल्याने आरोग्य विभागाची धाकधूक वाढलीय.

मुंबई : गेली दोन वर्षाहून अधिक काळ राज्यासह देशात कोरोनाने धुमाकूळ घातला. आता कोठेतरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असता राज्यात गोवर आजाराचा संसर्ग मोठ्या वेगाने पसरत असल्याने आरोग्य विभागाची धाकधूक वाढलीय. गोवरचा संसर्गाचा वेग पाहता मुंबई शहरात आतापर्यंत तब्बल 8 रुग्णांचा गोवरमुळे मृत्यू झाला आहे.

Measles Outbreak in Maharashtra​
मुंबईतील गोवर आजार नियंत्रणाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

राज्यात आतापर्यंत गोवरचे 1259 संशयित रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत 164 रुग्णांचं निदान झालंय. मुंबईत 8 रुग्णांचा गोवरने मृत्यू झालाय. त्यापैकी एका बालकाने गोवरची लस घेतली होती. इतरांच्या लसीची नोंद नाही, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. गोवर लस न घेतलेल्या 5 ते 9 वर्ष वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरू आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आलीय.

गोवरचा वाढता प्रादूर्भाव पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर गोवर संदर्भात आरोग्य विभागाची बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांनी लसीकरण करण्यासंदर्भात सूचना दिल्या. मुख्यमंत्र्यांनी लहान मुलांना लवकरात लवकर गोवरची लस देण्याचे आदेश दिले. राज्यात 164 रुग्ण आहेत. त्यापैकी कस्तूरबा रुग्णालयात 74 रुग्णांवर उपचार घेत आहेत. अनेक रुग्णांची प्रकृती बरी आहे. एक-दोन रुग्ण आयसीयूत आहेत. बाकी बालकांची प्रकृती चांगली आहे. लस न घेतलेल्या मुलांचं प्रमाण मोठं आहे. 258 पैकी फक्त 50 बालकांनी लस घेतलीय.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com