ATS Arrest Terrorist : अल-कायदाशी संबंधित 4 दहशतवाद्यांना अटक; गुजरात एटीएसची कारवाई

ATS Arrest Terrorist : अल-कायदाशी संबंधित 4 दहशतवाद्यांना अटक; गुजरात एटीएसची कारवाई

गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) एक्यूआयएस (भारतीय उपखंडातील अल-कायदा) शी संबंधित चार कथित दहशतवाद्यांना अटक केली आहे
Published by :
Rashmi Mane
Published on

गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) एक्यूआयएस (भारतीय उपखंडातील अल-कायदा) शी संबंधित चार कथित दहशतवाद्यांना अटक केली आहे, अशी माहिती वृत्तसंस्था एएनआयने दिली आहे. वृत्तानुसार, अहमदाबादमधून 2, दिल्लीतून एक आणि नोएडामधून एक दहशतवाद्यांना आज, 23 जुलै रोजी अटक करण्यात आली. या कारवाईची माहिती पत्रकार परिषदेत दिली जाईल, असे एटीएसचे डीआयजी सुनील जोशी यांनी सांगितले.

त्या चार दहशतवाद्यांची नावे अशी -

1. मोहम्मद फैक

२. मोहम्मद फरदीन

3. सेफुल्ला कुरेशी

4. झिशान अली

हेही वाचा

ATS Arrest Terrorist : अल-कायदाशी संबंधित 4 दहशतवाद्यांना अटक; गुजरात एटीएसची कारवाई
Kalyan Crime : कल्याणमधील मारहाण प्रकरणाला नवीन वळण; रिसेप्शन मुलीकडून गोकुळच्या वहिनीला मारहाण
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com