'छळ,कपट आणि अहंकार खासदारांच्या तोंडी शोभत नाही' रोहित पाटलांचा पलटवार

'छळ,कपट आणि अहंकार खासदारांच्या तोंडी शोभत नाही' रोहित पाटलांचा पलटवार

खासदार संजयकाका पाटलांच्या तोंडातून छळ, कपट आणि अहंकार,हे शब्द शोभत नाहीत,अश्या शब्दात राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर आर पाटलांनी पलटवार केला आहे.

संजय देसाई,सांगली: खासदार संजयकाका पाटलांच्या तोंडातून छळ, कपट आणि अहंकार,हे शब्द शोभत नाहीत,अश्या शब्दात राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर आर पाटलांनी पलटवार केला आहे. तसेच आम्हाला सत्तेचा गर्व कधी झाला नाही, आम्ही सत्तेच्या गर्तेत कधीच अडकलो नाही,अश्या शब्दात टीका देखील रोहित पाटलांनी खासदार संजयकाका पाटलांवर केली आहे.

कवठेमहांकाळ नगरपंचायती नगराध्यक्ष निवडणुकीमध्ये भाजपा खासदार संजयकाका पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पाटील यांच्या ताब्यातली सत्ता काढून घेतली आहे. राष्ट्रवादीची चार मते फुटल्याने बहुमत असून देखील राष्ट्रवादीला पराभवाला सामोरे जावे लागले आहे, या विजयानंतर भाजपा खासदार संजय काका पाटील यांनी रोहित आर.आर. पाटील यांच्यावर निशाणा साधत छळ कपट अहंकार आणि गर्व रोहित पाटलांना होतात,अशी टीका केली होती.

दरम्यान आज सांगलीमध्ये रोहित आर. आर.पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन खासदार संजयकाका पाटील यांच्यावर पलटवार केला आहे. छळ,कपाट आणि अहंकार हे शब्द संजयकाका पाटील यांच्या तोंडातून शोभत नाही. संपूर्ण तालुकाच नव्हे तर जिल्ह्याला हे माहित आहे. तसेच आर आर आबा हे सात वेळा विजय झाले होते. त्यानंतर सुमनताई हे दोन वेळा विजय झाल्या, पण आम्हाला कधीच आज पर्यंत गर्व झाला नाही. पराभव आणि विजयाच्या गर्तेत आम्ही कधीच अडकलो नाही,तालुक्यातल्या जनतेला देखील माहित आहे,आणि तालुक्यातल्या जनतेने नेहमीच मत पेटीतून हे दाखवून दिलं आहे,अश्या शब्दात रोहित पाटलांनी संजयकाका पाटलांना टोला लगावला आहे.

'छळ,कपट आणि अहंकार खासदारांच्या तोंडी शोभत नाही' रोहित पाटलांचा पलटवार
सत्तानाट्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com