बातम्या
ईडीच्या धाडीनंतर हसन मुश्रीफ यांच्या पत्नीची प्रतिक्रिया म्हणाल्या आम्हाला गोळ्या घाला आणि...
हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरावर पुन्हा ईडीची धाड पडली आहे.
हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरावर पुन्हा ईडीची धाड पडली आहे. पहाटे 4 ते ५ अधिकाऱ्यांचे पथक मुश्रीफांच्या घरी दाखल झाले आहे. दीड महिन्यात ईडीने दुसऱ्यांदा मुश्रीफांच्या घरी धाड टाकली आहे.
ईडीकडून महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. संताजी घोरपडे साखर कारखान्यातील घोटाळ्याप्रकरणी मुश्रीफ यांच्या घरावर धाड पडली आहे. मुश्रीफ यांच्या घराबाहेर सुरक्षा रक्षकांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सकाळीच मुश्रीफ यांच्या घरी येऊन तपासणी सुरू केली आहे.
याच पार्श्वभूमीवर त्यांच्या पत्नीने प्रतिक्रिया दिली आहे. हसन मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा म्हणाल्या की, “तुम्ही सगळे शांत राहा. ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगा आम्हाला गोळ्या घालून जा” असे त्या म्हणाल्या.