Supriya Sule, Amruta Fadnavis
Supriya Sule, Amruta Fadnavis Team Lokshahi

सुप्रिया सुळेंना मी फॉलो करत नाही : अमृता फडणवीस

वेदांता-फॉक्सकॉन हा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने राज्यामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. यातच आता फॉक्सकॉन प्रकल्पावरून सुप्रिया सुळेंच्या टीकेला अमृता फडणवीसांनी परभणीच्या गंगाखेड शहरात प्रत्युत्तर दिलंय.

वेदांता-फॉक्सकॉन हा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने राज्यामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. यातच आता फॉक्सकॉन प्रकल्पावरून सुप्रिया सुळेंच्या टीकेला अमृता फडणवीसांनी परभणीच्या गंगाखेड शहरात प्रत्युत्तर दिलंय.

अमृता फडणवीस म्हणल्या की, सुप्रिया सुळेंना मी फॉलो करत नाही म्हणत. तसेच राजकारण वेगळ्या स्तराला गेलं असून आताच सरकार जनतेच्या सेवेसाठी २४ तास काम करत असल्याचा विश्वास अमृता फडणवीसांनी वक्त केला. तसेच गंगाखेडमध्ये आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वतीने दिव्यांगांसाठी साहित्य वाटपाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला अमृता फडणवीसांनी उपस्थिती दर्शवली होती.

वेदांता प्रकल्पावरून सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा साधला होता. त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्र्यांनी गंभीर व्हावं. राज्य आणि देशासमोर बेरोजगारीचं मोठं आव्हान आहे. त्यामुळे हलगर्जीपणा करून चालणार नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी. राज्याच्या हितासाठी एकत्र यावं. सर्व पक्षीय प्रतिनिधींचं शिष्टमंडळ दिल्लीत न्यावं. पंतप्रधानांना भेटून आपला प्रकल्प परत आणावा.

तसेच राज्यातील अडीच ते तीन लाख रोजगाराचा प्रश्न आहे. त्यावर गांभीर्य व्हायला हवं. तळेगावला साईट पाहिली होती. सर्व तयारी झाली होती. मग अचानक काय झालं? प्रकल्प गुजरातला गेला. त्याची जबाबदारी घ्या. सत्तेत बसणं म्हणजे नुसतच सत्कार घेणं. लाल दिवा बंद करून लोकांची गैरसोय करणं आणि गाड्यांचा सुसाट धावणारा ताफा नसतो. सर्वसामान्य लोकांची सेवा करण्याची संधी यालाच सत्ता म्हणतात.

Supriya Sule, Amruta Fadnavis
आदित्यला काय कळतं..., 'कोण ओळखतं त्याला? - नारायण राणेंची आदित्य ठाकरेंवर टीका

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com