LOKशाहीच्या बातमीचा इम्पॅक्ट; पुण्यातील सेक्स तंत्र शिबीर झालं रद्द

LOKशाहीच्या बातमीचा इम्पॅक्ट; पुण्यातील सेक्स तंत्र शिबीर झालं रद्द

सांस्कृतिक वारसा लाभलेले पुणे शहर. पुण्यात वेगवेगळ्या पद्धतीने सांस्कृतिक वारसा जपला जातो. मात्र याच सांस्कृतिक वारसा असलेल्या पुणे शहरातून एक धक्कादायक माहिती समोर आली होती.

सांस्कृतिक वारसा लाभलेले पुणे शहर. पुण्यात वेगवेगळ्या पद्धतीने सांस्कृतिक वारसा जपला जातो. मात्र याच सांस्कृतिक वारसा असलेल्या पुणे शहरातून एक धक्कादायक माहिती समोर आली होती. पुणे शहरात नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने तरुणाईला लैंगिक प्रशिक्षण देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. सत्यम शिवम सुंदरम नावाच्या फाउंडेशनच्या वतीने सेक्स तंत्र नावाने या प्रशिक्षणाचे ऑनलाईन बुकिंग केले जात असल्याची धक्कादायक माहिती मिळाली होती.

याची माहिती मिळताच लोकशाही न्यूज मराठी चॅनेलने बातमी चालवली असून लोकशाही न्यूज मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट पडला आहे. LOKशाहीच्या बातमीनंतर पुण्यातील सेक्स तंत्र शिबीर रद्द झालंय. नवरात्रीत आयोजित केलेल्या शिबिराच्या विरोधानंतर आयोजक बॅकफूटवर आलेत. कारवाईच्या इशाऱ्यानंतर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

या लैंगिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन एक दोन आणि तीन ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले होते. यात तरुण - तरुणी सहभाग घेणार असल्याची माहिती असून या लैंगिक प्रशिक्षण केंद्रात ध्यानधारणा कशी करावी आणि कामसूत्रातील लैंगिक क्रिया या संदर्भात प्रशिक्षण दिले जाणार होते.

LOKशाहीच्या बातमीचा इम्पॅक्ट; पुण्यातील सेक्स तंत्र शिबीर झालं रद्द
पुण्यात नवरात्रीत 'लवयात्री'? भर नवरात्रीत लैंगिक शिक्षणाचा धक्कादायक प्रकार
Lokshahi
www.lokshahi.com