ताज्या बातम्या
Sanjay Shirsat : शिंदे गटाला मोठा धक्का! मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस
Income Tax Notice : शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांच्या विट्स हॉटेल लिलावावर आयकर विभागाची कारवाई.
Notice from Income Tax Department to Minister Sanjay Shirsat Government : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवणाऱ्या एका महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. महायुती सरकारमधील एकनाथ शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस मिळाली आहे. विवादग्रस्त विट्स हॉटेलच्या लिलावा संबधित नोटीस असल्याचे सांगितले जात आहे. सार्वजनिक कार्यक्रमात शिरसाट यांनी माहिती दिली असून सत्ताधारी शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलेल्या तक्रारीनंतर ही नोटीस देण्यात आली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे.