Zohran Mamdani : न्यूयॉर्क महापौरपदाच्या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांचा ऐतिहासिक विजय

Zohran Mamdani : न्यूयॉर्क महापौरपदाच्या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांचा ऐतिहासिक विजय

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात 2025 मध्ये झालेल्या महापौर निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी मोठा विजय मिळवून इतिहास रचला आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात 2025 मध्ये झालेल्या महापौर निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी मोठा विजय मिळवून इतिहास रचला आहे. मंगळवार, 24 जून रोजी पार पडलेल्या डेमोक्रॅटिक प्रायमरीमध्ये ममदानी यांनी माजी गव्हर्नर अँड्र्यू कुओमो यांचा पराभव केला. रँकिंग-चॉइस सिस्टीमनुसार झालेल्या मतदानात कुओमो यांना केवळ 36.4 टक्के मते मिळाली, तर ममदानी आघाडीवर राहिले.

जोहरान ममदानी यांचा जन्म युगांडातील कंपाला येथे झाला असून त्यांचे वडील महमूद ममदानी हे शिक्षणतज्ज्ञ आहेत, तर आई मीरा नायर प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्मात्या आहेत. वयाच्या सातव्या वर्षी ममदानी कुटुंब न्यूयॉर्कमध्ये स्थायिक झाले. 2018 मध्ये जोहरान यांनी अमेरिकन नागरिकत्व मिळवले. त्यांनी बोडोइन कॉलेजमधून आफ्रिकाना स्टडीजमध्ये पदवी घेतली असून, राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी सल्लागार म्हणून सामाजिक कार्य केले.

राजकीय कारकिर्दीत त्यांनी 2020 मध्ये विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून आपली छाप पाडली. न्यूयॉर्क विधानसभेत प्रवेश करणारे ते पहिले दक्षिण आशियाई आणि युगांडातील मूळ असलेले पहिले व्यक्ती ठरले. मुस्लिम समुदायाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ममदानी यांनी समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी सातत्याने आवाज उठवला आहे.

महापौरपदासाठीच्या प्रचारात त्यांनी शहरातील वाढत्या भाडेवाढीविरोधात ठोस भूमिका घेतली. त्यांनी जाहीर केले आहे की, श्रीमंत एक टक्का लोकांकडून अतिरिक्त कर आकारून सामान्य नागरिकांसाठी आवश्यक धोरणं राबवली जातील. बर्नी सँडर्स आणि अलेक्झांड्रिया ओकासिओ-कॉर्टेझसारख्या डाव्या विचारसरणीच्या नेत्यांनी त्यांना पाठिंबा दर्शविला होता.

जर नोव्हेंबरमध्ये त्यांचा अधिकृत विजय निश्चित झाला, तर ते न्यूयॉर्कचे पहिले भारतीय व मुस्लिम महापौर ठरतील. त्यामुळे डेमोक्रॅटिक पक्षासाठीही हा विजय मोठा राजकीय टप्पा ठरेल, अशी राजकीय विश्लेषकांची प्रतिक्रिया आहे.

हेही वाचा

Zohran Mamdani : न्यूयॉर्क महापौरपदाच्या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांचा ऐतिहासिक विजय
Marathwada Water Issue : ऐन पावसाळ्यात मराठवाडा तहानलेलाच, 268 गावांना टँकरची गरज
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com