Nitin Gadkari On Indian Roads : पुढील दोन वर्षात भारतातील रस्ते अमेरिकेसारखे होतील; नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
केंद्रातील रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी भारतीय रस्ते पायाभूत सुविधा पुढील दोन वर्षांत अमेरिकेच्या तुलनेत चांगली होतील, असे प्रतिपादन केले. गेल्या दशकात त्यांच्या सरकारने रस्ते आणि महामार्गांवर खर्च वाढवला असल्याचेही म्हटले आहे.
एनआयएला दिलेल्या मुलाखतीत नितीन गडकरी म्हणाले की, "प्रश्न फेसलिफ्टचा नाहीये, तो आधीच बदलला आहे. तुम्ही नुकताच बातम्यांचा रील पाहिला आहे, मुख्य चित्र अजून सुरू व्हायचे आहे. पाइपलाइनमधील प्रकल्प वेगाने प्रगती करत आहेत. पुढील दोन वर्षांत, तुम्हाला दिसेल की भारतीय रस्ते पायाभूत सुविधा अमेरिकेसारख्याच होतील." भारतीय रस्त्यांचा चेहरामोहरा पूर्णपणे कधी बदलू शकतो, असे विचारले असता त्यांनी हे उत्तर दिले.
पुढे गडकरी म्हणाले की, "अमेरिकेतील काही लोकं मला भेटले आणि म्हणाले की आमची पायाभूत सुविधा अमेरिकेपेक्षा चांगली आहे," असे त्यांनी पूरक विधान केले. त्यांच्या सरकारने आखलेल्या चांगल्या रस्त्यांमुळे भारतातील लॉजिस्टिक्स खर्च कमी झाला आहे, असे मंत्र्यांनी सांगितले आणि निर्यात स्पर्धात्मकतेत आणखी सुधारणा होईल, असेही ते म्हणाले.
"जर आपण आपली निर्यात वाढवली तर आपले कृषी क्षेत्र, उत्पादन आणि सेवा यासह इतर सर्व क्षेत्रांमध्ये सुधारणा होईल," असे ते म्हणाले. मंत्र्यांनी सांगितले की, भारतातील मुख्य चिंता म्हणजे उच्च लॉजिस्टिक्स खर्च. चीनचा ८ टक्के आणि अमेरिका आणि युरोपीय देशांचा १२ टक्के, असा १६ टक्के आहे.