IndiGo : विमान उड्डाणं रद्द करणं इंडिगोला पडलं महागात; तब्बल 7 हजार 160 कोटी रुपयांचं नुकसान
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(IndiGo) इंडिगो गेल्या तीन दिवसांपासून गंभीर अडचणींना सामोरे जात आहे. गुरुवारी कंपनीने तब्बल ५५० उड्डाणे रद्द केली.केबिन क्रूची कमतरता, तांत्रिक अडचणी आणि इतर ऑपरेशनल समस्यांमुळे मोठ्या प्रमाणात सेवा बाधित होत आहेत.
यातच आता इंडिगोवरील संकट आणखी गडद होणार असल्याची शक्यता असून 8 डिसेंबरपासून विमानांची संख्या कमी केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. फेब्रुवारीपर्यंत विमानांची संख्या पूर्ववत करण्यात येणार असून नागरी हवाई वाहतूक मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालय अधिकाऱ्यांनी इंडिगोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली.
यातच आता विमान उड्डाणं रद्द करणं इंडिगोला महागात पडल्याचे पाहायला मिळत आहे इंडिगोचं तब्बल 7 हजार 160 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. इंडिगोला पायलट आणि क्रू मेंबर्सची कमतरता भासत आहे. एअरलाइनला 200 हून अधिक उड्डाणे रद्द करावी लागली. यामुळे कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांपेक्षा जास्त घसरल्याचे पाहायला मिळाले.
Summery
विमान उड्डाणं रद्द करणं इंडिगोला पडलं महागात
तब्बल 7 हजार 160 कोटी रुपयांचं नुकसान
इंडिगोला पायलट आणि क्रू मेंबर्सची कमतरता
