ईशा अंबानी जुळ्या बाळांसह मुंबईत दाखल , स्वागताची जंगी तयारी

ईशा अंबानी जुळ्या बाळांसह मुंबईत दाखल , स्वागताची जंगी तयारी

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी आणि त्यांचे पती आनंद पिरामल हे आज त्यांच्या जुळ्या बाळांसोबत मुंबईत दाखल झाले आहेत.
Published by :
shamal ghanekar
Published on

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी आणि त्यांचे पती आनंद पिरामल हे आज त्यांच्या जुळ्या बाळांसोबत मुंबईत दाखल झाले आहेत. तसेच विमानातून येताना अमेरिका आणि भारतातील स्पेशालिस्ट डॉक्टरांची टीमही त्यांच्यासोबत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी खास तयारी केली होती. याप्रसंगी अंबानी कुटुंबीय तब्बल 300 किलो सोनं दान करणार आहे.

ईशा अंबानी जुळ्या बाळांसह मुंबईत दाखल , स्वागताची जंगी तयारी
ईशा अंबानी जुळ्या बाळांसह आज भारतात येणार, स्वागताची जंगी तयारी

ईशा अंबानीच्या 'करुणा सिंधू' निवासस्थानावर देशभरातील एक हजार साधूसंत या जुळ्या बाळांना आशिर्वाद देण्यासाठी बोलावण्यात आलं आहे. बाळांसाठी चक्क बीएमडब्ल्यू कंपनीकडून कार सीट डिझाईन करण्यात आली आहे. बाळांची देखभाल करण्यासाठी अमेरिकेहून आठ स्पेशल ट्रेनिंग घेतलेल्या नॅनी येणार आहेत. जगभरातील फेमस शेफ याप्रसंगी पंचपक्वान्न बनवणार आहेत. तसेच, तिरुपती, द्वारका येथूनही मिष्ठान्न आणण्यात येतील.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com