आर्यन खान प्रकरणाचा 18 कोटींचा सौदा; वानखेडेंविरोधातील एफआयआरमध्ये खुलासा

आर्यन खान प्रकरणाचा 18 कोटींचा सौदा; वानखेडेंविरोधातील एफआयआरमध्ये खुलासा

आर्यन खान प्रकरणी एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे अडचणी वाढताना दिसत आहेत.

मुंबई : आर्यन खान प्रकरणी एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे अडचणी वाढताना दिसत आहेत. सीबीआयने समीर वानखेडे यांच्याविरुध्द एफआयआर नोंदवला आहे. यामध्ये अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला गोवण्यात न येण्याच्या बदल्यात 25 कोटींची लाच मागितल्याचा आरोप समीर वानखेडेंवर ठेवण्यात आला आहे.

आर्यन खान प्रकरणाचा 18 कोटींचा सौदा; वानखेडेंविरोधातील एफआयआरमध्ये खुलासा
बेगाने की शादी में अब्दुल्ला दीवाना; दरेकरांचा उध्दव ठाकरेंना टोला

एफआयआरनुसार, समीर वानखेडेच्या सांगण्यावरून गोसावीने आर्यन खान प्रकरणात 25 कोटींची मागणी केली होती. या रकमेच्या बदल्यात आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अडकवणार नाही, असे आश्वासन देण्यात आले होते. समीर वानखेडे यांनी गोसावी यांना सौद्याच्या पैशाच्या प्रकरणात संपूर्ण सूट दिली होती. गोसावी यांनी 18 कोटींचा सौदा पक्का केला होता. एवढेच नाही तर गोसावी यांनी ५० लाख रुपये अॅडव्हान्सही घेतले होते.

तपासात समीर वानखेडेनेही आपल्या परदेश प्रवासाबाबत योग्य माहिती दिली नव्हती. त्यांनी त्यांच्या महागड्या घड्याळ आणि कपड्यांबद्दल देखील सांगितले नाही. समीर वानखेडे यांच्या बेहिशोबी मालमत्तेचाही एफआयआरमध्ये उल्लेख आहे.

तत्पुर्वी, सीबीआयने 12 मे रोजी समीर वानखेडेंवर मोठी कारवाई करत त्यांच्या घरावर छापा टाकला होता. सीबीआयच्या पथकाने वानखेडेंची मुंबईतील घरी 13 तासांहून अधिक काळ चौकशी केली होती.

दरम्यान, मुंबई जवळच्या समुद्रकिनाऱ्यावर क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणाचा समीर वानखेडे तपास करत होते. याप्रकरणी बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली होती. आर्यनची नंतर उच्च न्यायालयात जामिनावर सुटका करण्यात आली. यादरम्यान, समीर वानखेडे हे संशयाच्या भोवऱ्यात अडकले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com