प्रजासत्ताक दिनीच मंत्रालयासमोर महिलेकडून आत्मदहनाचा प्रयत्न

प्रजासत्ताक दिनीच मंत्रालयासमोर महिलेकडून आत्मदहनाचा प्रयत्न

पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत तातडीने महिलेला ताब्यात घेतलं

मुंबई : प्रजासत्ताक दिन काल संपूर्ण राज्यात उत्साहात पार पडला. परंतु, या दिनी मुंबईच्या मंत्रालयासमोरच शेतकरी महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत तातडीने महिलेला ताब्यात घेतलं. यामुळे मोठा अनर्थ टळला.

प्रजासत्ताक दिनीच मंत्रालयासमोर महिलेकडून आत्मदहनाचा प्रयत्न
महाराष्ट्राला गद्दारी आवडत नाही सुप्रिया सुळेंचा शिंदे - फडणवीस सरकारवर निशाणा

वंदना पाटील असे ताब्यात घेतलेल्या शेतकरी महिलेचे नाव असून ती मूळची जळगाव, जामनेर येथील नेरी गावची राहणारी आहे. वंदना पाटील यांच्या पतीने शेतात सोयाबीन पिकवला होता. या सोयाबीन व मकाची कोठारी बंधु यांनी परस्पर विक्री केल्याचा त्यांचा आरोप आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी मुंबईच्या मंत्रालयासमोरच शेतकरी महिलेने रॉकेल अंगावर ओततत आत्मदहानाचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत तातडीने महिलेला ताब्यात घेतलं. या प्रकरणी पीडित महिलेविरोधात मरीन ड्राइव्ह पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पाटील यांन ४१(अ)(१) ची नोटीस देऊन पोलिसांनी सोडललं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com