Aurangabad Shahganj
Aurangabad ShahganjTeam Lokshahi

संक्रांतीच्या दिवशी औरंगाबादमध्ये मोठी घटना, शहागंज कपडा मार्केटमध्ये दुकानाला आग

औरंगाबादमधील प्रमुख कपडा मार्केट असणारे ठिकाण शहागंज येथे एका दुकानाला आग लागल्याची घटनासमोर आली आहे.

आज ऐन संक्रांतीच्या दिवशी औरंगबादमधून एक मोठी घटना समोर आली आहे. औरंगाबादमधील प्रमुख कपडा मार्केट असणारे ठिकाण शहागंज येथे एका दुकानाला आग लागल्याची घटनासमोर आली आहे. आज मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यासाठी नागरिक त्या ठिकाणी दाखल झाले. त्या ठिकाणी आज गर्दी दिसून आली. मात्र, आग लागल्याने काही काळ त्या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला. विशेष म्हणजे सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

Aurangabad Shahganj
अमृता फडणवीसांनी दिल्या खास मकर संक्रांतीच्या शुभेच्छा, पाहा व्हिडीओ

माहितीनुसार, दुपारच्या सुमारास शहागंज परिसरात असलेल्या न्यु फॅशन होलसेल कापड दुकानाच्या तिसऱ्या मजल्यावरील गोडाऊनला आग लागली. पाहता पाहता आगीचा भडका उडाला आणि परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पाहायला मिळाले.आगीमुळे आजूबाजूच्या दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सध्या अग्निशमन दल आगी विझवण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न सुरु आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com