Bageshwar Baba
Bageshwar BabaTeam Lokshahi

संत तुकाराम महाराजबद्दल केलेल्या विधान बागेश्वर बाबांनी घेतले मागे; म्हणाले, मी आपल्या परिने...

संत तुकाराम महाराज यांना त्यांची पत्नी रोज मारहाण करायची. म्हणूनच त्यांनी देवाचा धावा घेतला. असे विधान त्यांनी केले आहे.

काही दिवसांपासून बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज बागेश्वर बाबा हे प्रचंड चर्चेत आले आहे. त्यांच्या चमत्काराच्या दाव्यामुळे ते चर्चेत आले सोबतच अडचणीत सापडले. हा वाद संपत नाही तर त्यांनी संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले. त्यामुळे राज्यात वारकरी संप्रदाय प्रचंड आक्रमक झाला होता. सोबतच राजकीय वर्तुळातून सुद्धा जोरदार विरोध व्यक्त केला जात होता. भाजपने देखील बागेश्वर महाराजांनी आपलं वक्तव्य मागे घ्यावं, अशी मागणी केली होती. वाद वाढत असल्यानं आता बागेश्वर बाबांनी संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य मागे घेतलं आहे.

Bageshwar Baba
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा मुंबई दौऱ्यावर; जाणुन घ्या कशासाठी असेल हा दौरा?

काय म्हणाले दिलगिरी व्यक्त करताना बागेश्वर बाबा?

संत तुकाराम महाराज हे महान संत आहेत. मी एका पुस्तकात त्यांच्याशी संबंधित एक गोष्ट वाचली होती. त्यांच्या पत्नी विचित्र स्वभावाच्या होत्या. मी त्यांच्या ऊसाच्या टिपऱ्याचीही गोष्ट एका पुस्तकात वाचली होती. संत तुकारामांच्या पत्नी त्यांना एकदा ऊस आणायला पाठवतात. पण ऊस आणल्यानंतर त्याच ऊसाने त्यांच्या पत्नी त्यांना मारतात. यामध्ये ऊसाचे दोन तुकडे होतात. ही गोष्ट मी आपल्या परिने भाविकांना सांगितली. पण आपल्या गोष्टीमुळे वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या. त्यामुळे मी माझे शब्द मागे घेतो. असे म्हणत त्यांनी संत तुकाराम यांच्याबद्दल केलेलं विधान मागे घेतले.

Bageshwar Baba
शिंदे गटाच्या त्या दाव्यावर राऊतांंचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, बापाची न्यायालये...

काय होते बागेश्वर बाबाचे आक्षेपार्ह विधान?

संत तुकाराम महाराष्ट्रातील एक महात्मा होते. त्यांची पत्नी त्यांना रोज मारायची. रोज काठीने मारायची. कुणी तरी त्यांना विचारलं, तुम्ही रोज बायकोचा मार खाता. तुम्हाला लाज नाही वाटत का? त्यावर तुकाराम म्हणाले, मला मारहाण करणारी बायको मिळाली ही देवाचीच कृपा आहे. त्यावर ती व्यक्ती म्हणाली, यात देवाची कृपा काय? तेव्हा तुकाराम म्हणाले, अरे वा… प्रेम करणारी पत्नी मिळाली असती तर मी देवाच्या प्रेमात पडलो नसतो. भक्तीत लीन झालो नसतो. पत्नीच्या प्रेमात पडलो असतो. मारहाण करणारी पत्नी मिळाल्याने देव मला त्याची सेवा करण्याची संधी तर देतो. प्रभू रामाच्या चरणी लीन होण्याची संधी तर देतोय. असे विधान त्यांनी केले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com