वादळामध्ये पत्र्याची घर झाली जमीनदोस्त; कुटुंब मुलाबाळांसह तहसील कार्यालयात

वादळामध्ये पत्र्याची घर झाली जमीनदोस्त; कुटुंब मुलाबाळांसह तहसील कार्यालयात

राज्यात अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या आहेत.

बालाजी सुरवसे | धाराशिव : राज्यात अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या आहेत. यामुळे बत्ती गुल झाली तर काही ठिकाणी पत्रे उडून गेले. धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात रात्री उशिरा आलेल्या वादळामध्ये अनेकांच्या पत्र्यांची घर जमीनदोस्त झाली. जीवाचा बचाव करत लहान मुलांना व वयोवृद्धाना बाहेर काढून या कुटुंबानी तहसील कार्यालय गाठले. व जोपर्यंत आम्हाला घर मिळत नाही तोपर्यंत तहसील कार्यालय सोडणार नसल्याचा निर्धार कुटुंबाने केला आहे.

वादळामध्ये पत्र्याची घर झाली जमीनदोस्त; कुटुंब मुलाबाळांसह तहसील कार्यालयात
राज्यात अवकाळी पाऊस; पिकांचं नुकसान

धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील खासापुरी हे गाव न्यायालयाच्या आदेशानुसार खाली करण्यात आले. त्यामुळे येथील ग्रामस्थ गेली दीड महिन्यांपासून तात्पुरत्या उभारलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये वास्तव करत आहेत. मात्र, सातत्याने या ग्रामस्थांना संकटाचा सामना करावा लागतोय. वादळ वाऱ्यामुळे सतत पत्रे उडून जातात. त्यामुळे आपल्या लहान मुलांना घेऊन ही कुटुंब जीवावर उदार होत याठिकाणी वास्तव करत आहेत. वादळामध्ये यापुर्वीही अनेकांना जीव धोक्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ घराचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी या कुटुंबाने वारंवार केली. मात्र, याकडे दुर्लक्ष केल जात आहे.

दरम्यान, काल रात्री उशीरा आलेल्या वादळी वाऱ्याने अनेकांची घर जमीनदोस्त झाली. यामध्ये अडकलेल्या लहान मुलांना व वयोवृद्धाना बाहेर काढून रातोरात या कुटुंबानी थेट तहसील कार्यालयात गाठले आहे. होळीचा सण एकीकडे सगळे जण उत्साहात साजरा करत असताना या कुटुंबाना मरण यातना सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे जोपर्यंत आमच्या घराचा प्रश्न मार्गी लागणार नाही तोपर्यंत तहसील कार्यालयातून उठणार नाही, असा पवित्रा या ग्रामस्थांनी घेतलाय. दोन दिवसात जर आमची सोय नाही केली तर आत्मदहन करण्याचा इशारा या ग्रामस्थांनी दिलाय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com