फक्त तीन हजार रुपयांसाठी आयटी इंजिनियरची हत्या; पोलिसांनी 24 तासात लावला छडा

फक्त तीन हजार रुपयांसाठी आयटी इंजिनियरची हत्या; पोलिसांनी 24 तासात लावला छडा

पोलिसांनी अवघ्या 24 तासात त्याच्या मारेकऱ्यांना अटक केली आहे.

अमोल धर्माधिकारी | पुणे : आयटी इंजिनियरची फक्त तीन हजार रुपयांसाठी हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी अवघ्या 24 तासात त्याच्या मारेकऱ्यांना अटक केली आहे. गौरव सुरेश उदाशी (वय 35) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर, टॅक्सी चालक भगवान केंद्रे आणि अमोल मानकर यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

फक्त तीन हजार रुपयांसाठी आयटी इंजिनियरची हत्या; पोलिसांनी 24 तासात लावला छडा
पृथ्वीतलावर माझ्या नावे घरच नाही; ED ला सामोरे जायला तयार - जयंत पाटील

माहितीनुसार, वाघोलीतील मल्हारी डोंगराच्या पायथ्याशी शनिवारी दुपारी गौरवचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला होता. तसेच, घटनास्थळी त्याची दुचाकी सापडली होती. दुचाकीवरून पोलिसांनी त्याची ओळख पटवली. शुक्रवारी रात्री गौरव जेवायला जातो सांगून घराबाहेर पडला होता. त्यानंतर तो परत आलाच नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपींना परतापुर येथून ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा मान्य केला. गौरवने 3 हजार परत न दिल्याने आरोपीने आपल्या साथीदाराच्या मदतीने गौरवचा खून केला. लोणीकंद पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com