J P Nadda
J P Nadda Team Lokshahi

'विकासाचे दुसरे नाव म्हणजे भाजप आणि विकासपुरुषाची ओळख म्हणजे मोदी'

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा आज चंद्रपुर दौऱ्यावर, भाजपचे मिशन 145 सुरु

चंद्रपूर : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा आज चंद्रपुर दौऱ्यावर आहेत. त्यांनी चंद्रपुरातुन भाजप मिशन 145 सुरु केले असून जाहीर सभा घेतली आहे. यावेळी नड्डांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. आम्ही जे बोललो ते आम्ही केले आहे, आम्ही जे बोलू ते करू. विकासाचे दुसरे नाव म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि विकासपुरुषाची ओळख म्हणजे नरेंद्र मोदी, असे त्यांनी म्हंटले आहे.

J P Nadda
ही बाई मला ज्यादिवशी सापडेल, तेव्हा थोबाड रंगवेन अन्...; चित्रा वाघ उर्फीवर संतापल्या

जे.पी. नड्डा म्हणाले की, जेव्हा जग संकटातून जात होता आणि प्रत्येक देश संकटात सापडत होता, तेव्हा आपण विपरीत परिस्थितीतही पुढे जात आहोत. हे केवळ पंतप्रधानांच्या नेतृत्वामुळेच. ब्रिटनसारखा देश ज्याने आपल्यावर 200 वर्षे राज्य केले. त्या देशातून बाहेर पडल्यानंतर आपण पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलो आहोत.

अमेरिका आणि युरोपमध्ये कोरोनाचे लसीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही. चीनची स्थिती तुम्ही पाहिलीच असेल. पण, भारतात 220 कोटींहून अधिक लसी देऊन जनतेला सुरक्षा कवच देण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केले आहे. भारताने 100 देशांमध्ये कोरोनाची लस पोहोचवली आहे आणि 48 देशांमध्ये ती मोफत उपलब्ध करून दिली आहे. आता भारत हा जगाकडून मागणी करणारा देश नाही तर मोदीजींच्या नेतृत्वाखाली देणारा देश बनला आहे, अशा शब्दात त्यांनी पंतप्रधानांचे कौतुक केले आहे.

J P Nadda
अजित पवार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचा किल्ले अजिंक्यताऱ्यावरून केला कडेलोट

मोदींच्या धोरणांमुळे आज आपण जगात प्रसिद्ध झालो आहोत असे नाही तर जगाचा दृष्टीकोन बदलला आहे. मोदी जेव्हा लाल किल्ल्यावरून 'स्वच्छ भारत'बद्दल बोलले तेव्हा काँग्रेस नेत्यांनी त्यांची खिल्ली उडवली. कारण ज्या कुटुंबातून ते आले आहेत त्यांना भारताच्या दुःखाची कल्पना नव्हती. या वेदनेचा जर कोणी अंदाज लावू शकला असता, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तो होता. म्हणूनच आमच्या प्रयत्नांमुळे देशात 12 कोटींहून अधिक शौचालये बांधली गेली, महिलांना सुविधा मिळाल्या.

आज मला या व्यासपीठावरून आकडे मोजले जात आहेत. कोणीही काँग्रेसचे काम असे मोजता येईल का? ही मोदीजींनी बनवलेली प्रणाली आहे ज्यात आपण आपले 'रिपोर्ट कार्ड' सोबत ठेवतो. आम्ही जे बोललो ते आम्ही केले आहे, आम्ही जे बोलू ते करू. विकासाचे दुसरे नाव म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि विकासपुरुषाची ओळख म्हणजे नरेंद्र मोदी, असेही त्यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com