समीर वानखेडेंच्या अडचणी वाढणार! सीबीआयनंतर आता आणखी एका विभागाकडून चौकशी सुरू

समीर वानखेडेंच्या अडचणी वाढणार! सीबीआयनंतर आता आणखी एका विभागाकडून चौकशी सुरू

समीर वानखेडेंची तब्बल साडेसहा तास सीबीआय चौकशी झाली.

मुंबई : आर्यन खान प्रकरणाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात मुंबई एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांना आज मुंबई उच्च न्यायालयाने 22 मेपर्यंत अटकेपासून दिलासा दिला आहे. तसेच, तपासात सहकार्य करण्यास सांगितले. यानुसार आज वानखेडेंची तब्बल साडेसहा तास सीबीआय चौकशी झाली. तर, आता याप्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. एकीकडे सीबीआयकडून चौकशी सुरू असतानाच सीबीआयसी (CBIC)कडूनही चौकशी सुरू झाली आहे. यामुळे वानखेडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

समीर वानखेडेंच्या अडचणी वाढणार! सीबीआयनंतर आता आणखी एका विभागाकडून चौकशी सुरू
बारसू रिफायनरीचा प्रकल्प जैतापूरला का नेत नाही? राज ठाकरेंच्या प्रश्नाला सामंतांचे उत्तर, म्हणाले...

सीबीआयसी म्हणजे केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क विभाग आहे. याच विभागाच्या अधिपत्याखाली अंतर्गत महसूल सेवा (IRS)वानखेडे अधिकारी म्हणून काम करतात. सीबीआयसी विभागाकडूनही आता समीर वानखेडेंची चौकशी सुरु करण्यात आली आहे. एनसीबीच्या एसआयटीने तयार केलेला अहवाल सीबीआयसी विभागाकडेही देण्यात आला आहे. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर आता याच अहवालाच्या आधारे त्यांची विभागीय चौकशी सुरू झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या चौकशीनंतर वानखेडे यांच्यावर लवकरच कारवाई होण्याची शक्यता असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाईदेखील होऊ शकते.

दरम्यान, आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडे यांच्यावर १८ कोटी रुपयांची तडजोड केल्याचा आरोप आहे. तर, ५० लाख रुपयांची लाच स्वीकारल्याचाही ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यासंदर्भात सीबीआयने वानखेडेविरोधात एफआयआर नोंदवला आहे. वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याची विनंती केली होती. यावेळी शाहरुख खानसोबत झालेल्या व्हॉटस अ‍ॅप चॅटही उघड केले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com