दहावीच्या परीक्षेत नेमकं काय सुरूय? बोर्डाच्या वेळापत्रकात तारखेचा घोळ; विद्यार्थी पेपरपासून वंचित

दहावीच्या परीक्षेत नेमकं काय सुरूय? बोर्डाच्या वेळापत्रकात तारखेचा घोळ; विद्यार्थी पेपरपासून वंचित

कधी बोर्डामुळे तर कधी शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप

बालाजी सुरवसे | धाराशिव : सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. मात्र, यात या ना त्या कारणाने परीक्षेमध्ये गोंधळच पाहायला मिळतो आहे. यात कधी बोर्डामुळे तर कधी शिक्षकांमुळे घोळ झाल्याचे पाहायला मिळते आहे. मात्र, याची नाहक शिक्षा विद्यार्थ्यांना भोगावी लागते आहे. त्यामुळेच धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा हिंदीचा पेपर हुकला आहे.

शालेय साहित्य प्रकाशित करणाऱ्या नवनीत प्रकाशकाने दहावीचे वेळापत्रक चुकीचे छापून वाटल्यामुळे अनेक दहावीच्या विद्यार्थ्यांना हिंदीच्या पेपरला मुकावे लागले. दरम्यान, या विद्यार्थ्यांनी संबंधित विषयाची पुन्हा परिक्षा घेण्याची मागणी केली आहे.

दहावीच्या परीक्षेत नेमकं काय सुरूय? बोर्डाच्या वेळापत्रकात तारखेचा घोळ; विद्यार्थी पेपरपासून वंचित
‘डीजीआयपीआर’मधील पाचशे कोटींच्या घोटाळ्याला दाबण्याचा सरकारचा प्रयत्न; विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा आरोप

दहावीतील हिंदी विषयाचा काल बुधवारी पेपर होता. मात्र, शालेय साहित्य प्रकाशित करणाऱ्या नवनीत प्रकाशन संस्थेने आणि काही अकॅडमींनी दहावीचा हिंदीचा पेपर 9 तारखेला गुरूवारी असल्याचे प्रकाशित केले. गंभीर बाब म्हणजे याचे वाटप शिक्षकांनी केल्यामुळे विद्यार्थ्यांनी खाजगी प्रकाशनाच्या वेळापत्रकावरती विश्वास ठेवला. परिणामी, जिल्ह्यातील हिंदीच्या पेपरला एकूण 524 विद्यार्थ्यांनी दांडी मारली. या प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यात गोंधळ उडाला असून अन्य जिल्ह्यातही अनेक विद्यार्थी हिंदीच्या पेपर पासून वंचित राहिले असण्याची शक्यता आहे. हा गोंधळ फक्त प्रकाशनामुळे किंवा खाजगी अकॅडमीच्या वेळापत्रकामुळे झाला आहे असं नाही तर बोर्डाने दिलेल्या वेळापत्रकात तारखेचा सिक्वेन्स चुकवल्यामुळे विद्यार्थ्यांना हा मनस्ताप सहन करावा लागला आहे.

दरम्यान, काही दिवसांपुर्वीही दहावीच्या इंग्रजी पेपरमध्ये घोळ झाल्याचे समोर आले होते. धाराशिव शहरातील शरद पवार हायस्कूल येथे एका हॉलमध्ये 25 विद्यार्थ्यांना सीबीएसईचा इंग्रजीचा पेपर सोडवण्यासाठी देण्यात आला होता. वास्तविक पाहता या विद्यार्थ्यांना मराठी माध्यमानुसार इंग्रजी पेपर देणे आवश्यक होते. या विद्यार्थ्यांना 875 कोड क्रमांकचा पेपर देण्याचे बोर्डाचे निर्देश असतानाही 784 कोड क्रमांकाचा पेपर देण्यात आला. यामुळे 25 विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून आपल्या भवितव्याचे काय होणार? असा प्रश्न पडला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com