'या' विद्यार्थ्यांनाच बारावी इंग्रजीच्या पेपरमधील चुकलेल्या प्रश्नांचे सहा मार्क दिले जाणार

'या' विद्यार्थ्यांनाच बारावी इंग्रजीच्या पेपरमधील चुकलेल्या प्रश्नांचे सहा मार्क दिले जाणार

यंदाच्या वर्षी बारावीच्या परीक्षांची सुरुवात गोंधळाने झाल्याचे पाहायला मिळाले आहे. पहिलाच पेपर इंग्रजीमध्ये तीन प्रश्न चुकले होते.

मुंबई : यंदाच्या वर्षी बारावीच्या परीक्षांची सुरुवात गोंधळाने झाल्याचे पाहायला मिळाले आहे. पहिलाच पेपर इंग्रजीमध्ये तीन प्रश्नांमध्ये एका प्रश्नाऐवजी चक्क उत्तरच देण्यात आले होते. तर इतर दोन प्रश्नांमध्ये प्रश्नाऐवजी तपासणाऱ्याला सूचना दिल्या होत्या. चूक लक्षात आल्यानंतर आता उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. इंग्रजीच्या पेपरमध्ये सहा मार्क उत्तराचे दिले जाणार आहेत.

'या' विद्यार्थ्यांनाच बारावी इंग्रजीच्या पेपरमधील चुकलेल्या प्रश्नांचे सहा मार्क दिले जाणार
करियर म्हणून राजकारण का निवडलं? शरद पवारांनी सांगितले गुपित

शिक्षण मंडळाच्या निर्णयानुसार, ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा विद्यार्थ्यांना सहा गुण दिले जाणार आहेत. त्यात पोएट्री विभागातील अन्य कोणताही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला असेल, त्रुटी असलेल्या ए ३ ते ए ५ या प्रश्नांचे क्रमांक केवळ उत्तरपत्रिकेत नमूद केले असेल, उत्तरपत्रिकेत पोएट्री विभाग पोएट्री सेक्शन २ असा उल्लेख केला असल्यास प्रत्येक प्रश्नाला दोन या प्रमाणे सहा गुण दिले जाणार आहेत.

दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिंदखेडराजा येथे परीक्षेच्या आधीच बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याचे समोर आले होते. यामुळे राज्यभरात खळबळ उडाली असून विधीमंडळातही याचे पडसाद उमटले आहे. विरोधकांनी पेपरफुटी प्रश्नी सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com