ठाकरेंकडे बेहिशोबी संपत्तीचा आरोप; गौरी भिडेंची याचिका फेटाळली

ठाकरेंकडे बेहिशोबी संपत्तीचा आरोप; गौरी भिडेंची याचिका फेटाळली

ठाकरे कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला

मुंबई : उध्दव ठाकरे यांच्यावर बेहिशेबी मालमत्तेचा आरोप करत गौरी भिडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. यामुळे ठाकरे कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे. याचवेळी गौरी भिडे यांना धक्का देत 25 हजारांचा दंडदेखील ठोठावला आहे.

ठाकरेंकडे बेहिशोबी संपत्तीचा आरोप; गौरी भिडेंची याचिका फेटाळली
पाण्यासाठी आदिवासी महिलेला विवस्त्र करुन मारहाण; अजित पवारांनी सरकारला धरले धारेवर

गौरी भिडे यांनी उध्दव ठाकरेंविरोधात जनहित याचिका दाखल केली होती. यात, उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या उत्पन्नाचा व संपत्तीचा ताळमेळ लागत नाही. यामुळे याची सीबीआय आणि ईडीमार्फत चौकशी केली जावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांची संपत्ती भ्रष्टाचार आणि गैरमार्गाने जमा केलेली बेहिशेबी मालमत्ता आहे. याविरोधात ११ जुलै २०२२ ला मुंबई पोलीस आयुक्तांकडे पत्र लिहून आम्ही तक्रारही केली आहे, असेही याचिकाकर्त्यानी म्हंटले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com