Crime
CrimeTeam lokshahi

धक्कादायक! प्रियकराने मित्राच्या मदतीने ३५ वार करत केली प्रेयसीची हत्या

मृतदेह टिटवाळा येथे आढळून आल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे

सुरेश काटे | मुंबई : प्रेमसंबंधातून लग्नासाठी तगादा लावल्याने प्रियकराने आपल्या एका मित्रासोबत विवाहित महिलेची ३५ वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तिचा मृतदेह टिटवाळा येथे आढळून आल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. जयराज चौरे व त्याचा मित्र सूरज घाटे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

Crime
शरद पवारांनी एवढी वर्षे राजकारण केलं, तरी त्यांचं बारामती होऊ शकलं नाही, - जितेंद्र आव्हाड

टिटवाळा येथील गोवेली परिसरात १२ डिसेंबरला एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या महिलेवर धारदार शस्त्राने तब्बल 35 वार करण्यात आले होते. याप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. टिटवाळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी संदीप शिंगटे यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान महिलेजवळ तिच्या आधार कार्ड सापडले होते. या आधार कार्डच्या आधारे या मयत महिलेची ओळख पटवली. या मयत महिलेच्या नातेवाईकांना संपर्क साधला. रुपांजली जाधव असे महिलेचे नाव असून ते पुण्याला राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

Crime
ट्वीटरवर योगी आदित्यनाथ ट्रेंडिंग; #Yoginomics हॅशटॅग होतोय ट्रेंड

रुपांजली जाधव ही विवाहित असून तिला तीन मुलं आहेत. दोन वर्षांपासून रुपांजलीचे पुण्यात राहणाऱ्या जयराज चौरे याच्याशी प्रेमसंबंध होते. रुपांजली जयराजकडे लग्नासाठी तगादा लावत ब्लॅकमेल करत होती. त्यामुळे जयराज संतापला होता. अखेर जयराजने रुपांजलीला संपवण्याचा निर्णय घेतला. रुपांजलीचा काटा काढण्यासाठी त्याने मित्रासोबत करण्याचा कट रचला होता. जयराजने रूपांजलीला दागिने घेऊन देतो, असे सांगत तिला टिटवाळ्याला घेऊन आला. टिटवाळा येथील गोवेली परिसरात जयराज व त्याचा मित्र सुरज घाटे यांनी रुपांजलीवर धारदार शस्त्राने वार करत तिची हत्या केली व तेथून पळ काढला. अखेर टिटवाळा पोलिसांनी जयराज व त्याचा मित्र सुरज या दोघांना अटक केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com