हदयद्रावक! लेकीला पोलीस भरतीसाठी पुण्यात घेऊन आलेल्या बापाचा दुर्दैवी अंत

हदयद्रावक! लेकीला पोलीस भरतीसाठी पुण्यात घेऊन आलेल्या बापाचा दुर्दैवी अंत

पोलीस भरतीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या आणि त्यांचे पालकांचे मोठ्या प्रमाणात हाल

अमोल धर्माधिकारी | पुणे : पोलीस भरतीला सुरुवात झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातून युवक-युवती पुण्यामध्ये येत आहेत. परंतु, या विद्यार्थी आणि त्यांचे पालकांचे हाल होत आहेत. हे पालक रस्त्यावर फुटपाथवर झोपताना देखील पाहायला मिळत आहेत. आणि यामुळेच वेगवेगळ्या घटना घडताना पाहायला मिळत आहेत. पुण्यामध्ये देखील अशीच धक्कादायक घटना घडली आहे.

आपल्या लाडक्या लेकीला पोलीस व्हायचं स्वप्न असल्याने आपल्या लेकीला पोलीस भरतीसाठी पुण्यामध्ये घेऊन आलेल्या एका दाम्पत्यावर काळाने घाला घातलेला आहे.

हदयद्रावक! लेकीला पोलीस भरतीसाठी पुण्यात घेऊन आलेल्या बापाचा दुर्दैवी अंत
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; कांद्याला प्रतिक्विंटल 300 रुपये अनुदान देणार - मुख्यमंत्री

सुरेश सखाराम गवळी (वय 55) यांची लेक ज्योती गवळी ही गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत आहे. पोलीस भरतीची तारीख कळल्यानंतर सुरेश आपल्या लेकीला आणि पत्नी ज्योती गवळी नाशिकहून पुण्याला घेऊन आले. काल रात्री पुण्यामध्ये उतरल्यानंतर त्यांनी शिवाजीनगर परिसरातील फुटपाथवर मुक्काम देखील केला. पहाटे दोनच्या दरम्यान मुलीचे ग्राउंड असल्याने मुलीला ग्राउंड वर सोडायला गेले.

मात्र, मुलीला रात्री ग्राउंडवर सोडल्यानंतर शिवाजीनगर परिसरातून हॉटेल प्राईडच्या दिशेने चहा पिण्यासाठी म्हणून सुरेश गवळी निघाले असता काळाने त्यांच्यावरती घाला घातला. एका अज्ञात वाहनाने सुरेश गवळी यांना उडवलं आणि यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या घटनेमुळे सर्वत्रच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com