भिवंडीत दगड खदाणीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू

भिवंडीत दगड खदाणीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू

भोईवाडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अभिजीत हिरे | भिवंडी : अवकाळी पावसाने दगड खदाणीत साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोघा लहान मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना भिवंडी परिसरात घडली आहे. सत्यम पन्नीलाल चौरसिया (वय 9.5) व शुभम जितेंद्र चौरसिया (वय 14, दोघे रा.नारपोली) असे मयत मुलांची नावे आहेत. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

भिवंडीत दगड खदाणीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू
रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानावर ड्रोन हल्ला; युक्रेनकडून पुतिन यांच्या हत्येचा प्रयत्न?

माहितीनुसार, सत्यम व शुभम हे दोघे आपल्या इतर मित्रांसह मंगळवारी दुपारी कालवार गावाच्या हद्दीतील दगड खदानमध्ये अवकाळी पावसाने साचलेल्या डबक्यात पोहण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्याने हे दोघे बुडले. सायंकाळी चार वाजले तरी मुले घरी न आल्याने कुटुंबियांनी परिसरात शोध घेतला. परंतु, ती मुले न सापडल्याने मुलांच्या हरविल्याची तक्रार भोईवाडा पोलिसांकडे नोंदविली होती.

बुधवारी सकाळी खदान येथील डबक्यात मुलांचे मृतदेह आढळून आल्याने त्याची माहिती मिळताच पोलिसांनी दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. या प्रकरणी भोईवाडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com