Crime
CrimeTeam lokshahi

विवाहबाह्य संबंधाचा धक्कादायक अंत! प्रेयसीला जाळण्याचा प्रयत्न; प्रियकराने उचललं टोकाचे पाऊल

खळबळजनक घटनेने चंद्रपूर जिल्हा हादरला

अनिल ठाकरे | चंद्रपूर : विवाहबाह्य संबंधाचा धक्कादायक शेवट झाल्याची घटना जिल्ह्यात उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रियकराने प्रेयसीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यानेही गळफास घेत जीवन संपविले. ही घटना मूल शहरात घडली. प्रेयसीला पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. बंडू निमगडे असे मृतकाचे नाव आहे.

Crime
पोलिसी बळाचा वापर करून दंडुकेशाहीने सर्वेक्षण करू नका; तात्काळ सर्वेक्षण स्थगित करा - अजित पवार

मूल येथील बंडू उर्फ रामचंद्र निमगडे या विवाहित व्यक्तीचे शहरातीलच एका विवाहित महिलेशी संबंध होते. बंडू हा विवाहित असून त्याला एक मुलगा आहे. शेजारी असलेल्या विवाहितेशी बऱ्याच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्यांच्या प्रेमसंबधाची चर्चा अधूनमधून व्हायची. त्यामुळे पत्नीसोबत बंडूचे नेहमी भांडणे व्हायचे. यामुळे तो मानसिकरित्या अस्वस्थ झाला होता. अशातच त्याने सोमवारी प्रेयसीचे घर गाठले. व रागाच्या भरात तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने कशीबशी स्वतःची सुटका केली. या प्रकारानंतर बंडूने स्वतःच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

पोलिसांना घटनेची माहिती मिळतात त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या प्रकाराने जखमी झालेल्या प्रेयसीला पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात हलवले व प्राथमिक उपचार करून तिला पुढील उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. या खळबळजनक घटनेने जिल्हा हादरला आहे. काही दिवसापूर्वी विवाहबाह्य संबंधातून झाडीपट्टीतील एका कलाकारने प्रेयसीच्या नावाने फेसबुकवर पत्र लिहून आत्महत्या केली होती. या घटनेच्या विसर अद्यापही जिल्ह्याला झालेला नाही. अशात मूल शहरातील घटनेने जिल्हा हादरला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com