नितीन गडकरी यांच्या कार्यालयात पुन्हा धमकीचा फोन; 10 कोटींची मागितली खंडणी

नितीन गडकरी यांच्या कार्यालयात पुन्हा धमकीचा फोन; 10 कोटींची मागितली खंडणी

नागपूरच्या खांमला येथे असलेल्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी धमकीचा फोन आला.

कल्पना नलसकर | नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दोन महिन्याच्या अंतराने पुन्हा एकदा धमकीचा फोन आला आहे. नागपूरच्या खांमला येथे असलेल्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी धमकीचा फोन आला. 10 कोटी रुपये खंडणीची मागणी करण्यात आलेली आहे. त्यानंतर नागपूर पोलिसमध्ये तक्रार करण्यात आलेली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नितीन गडकरी यांच्या कार्यालयात पुन्हा धमकीचा फोन; 10 कोटींची मागितली खंडणी
राऊतांना जशास तसे उत्तर देणार; शंभूराज देसाई आक्रमक

नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयाला पुन्हा एकदा धमकीचा फोन आलेला आहे आणि हा फोन बेळगाव कारागृहात असलेल्या आरोपी जयेश कांता उर्फ जयेश पुजारी याच्या नावाने करण्यात आला आहे. या फोनद्वारे खंडणी मागितल्याची तक्रार पोलिसात केली आहे. खंडणीचा फोन केल्यानंतर ज्या नंबरवर संपर्क करायला सांगितला होता तो नंबर बेळगावमधील एका तरुणीचा असल्याचे तपासात समोर आले आहे आणि त्या तरुणीचा मित्र हा बेळगाव जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. त्यामुळे आरोपी जयेश कांता याचा काय संबंध आहे याचा तपास नागपूर पोलीस करत आहे. तर, 14 जानेवारी रोजीही जयेश कांता उर्फ पुजारी या बेळगावच्या जेलमध्ये असलेल्या आरोपींनी फोन केले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com