Aaditya Thackeray
Aaditya Thackeray Team Lokshahi

'माझ्या मतदारसंघात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना सभा घ्यावी लागतेय, हाच माझा विजय'

शिवसंवाद यात्रेनिमित्त आदित्य ठाकरे आज निफाडमध्ये आहेत. यावेळी ते बोलत होते.

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात सभा घेणार आहेत. यावरुन आदित्य ठाकरेंनी आज शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मतदार संघात येऊन सभा घेतायत हाच माझा विजय आहे, असे त्यांनी म्हंटले आहे. शिवसंवाद यात्रेनिमित्त आदित्य ठाकरे आज निफाडमध्ये आहेत. यावेळी ते बोलत होते.

Aaditya Thackeray
बाळासाहेब थोरात करणार भाजप प्रवेश? बावनकुळे म्हणाले...

निफाडमध्ये मी पुन्हा आलोय. एका बाजूला शेती दिसतेय तर दुसरीकडे त्यांचे प्रश्न दिसतायत. अनेक ठिकाणी भेटीगाठी सुरु आहेत. काही ठिकाणी सांगतायत आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहोत. जिथं जिथं जातोय तिथं गद्दारी झाली असेल जे स्वतःला मोठे समजायचे ते गेले पण जे निष्ठावंत आहेत ते आपल्यासोबत आहेत. अडीच वर्षात काम बघून अनेक मतदार आपल्याला जोडले जात आहे.

वरळीमध्ये आजच सभा आहे. माझा हाच विजय आहे कि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मतदार संघात येऊन सभा घेतायत. जेव्हा फुटबॉलची मॅच असते तेव्हा मेस्सी आणि रोनाल्डोच्या बाजूला चार-पाच खेळाडू लावले जातात. सचिन तेंडुलकर यांच्यासाठी देखील वेगळी रणनिती आखली जाते. आता सभा घेतायत घ्या. वरळीत तुम्हाला गल्लीगल्लीत फिरायला लावेल, तरीही विजय माझाच आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.

डिपॉजिट जप्तच काय आताच भरायला तयार आहे. माझं डिपॉजिट जप्त झालं तरी चालेल पण तरी लढायला तयार आहे. अगोदर मला काय उद्धव ठाकरे यांना प्रशासकीय अनुभव नव्हता. आता अनुभव आहे. कोरोनामुळे महाराष्ट्राच कौतुक केलं. उद्योग क्षेत्रात आपण झेप घेतली. आताचे मुख्यमंत्री आहेत त्यांचं पहिल्या दहामध्ये देखील नाव नाही.

गद्दारी झाली तेव्हापासून किती प्रकल्प भारतात आले. आज नवीन प्रकल्प गेला असं पेपरला वाचलं मध्य प्रदेशला निवडणूक समोर ठेवून केलं जातंय, असा आरोप आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com