बेळगावातील मराठी नेत्यांच्या धरपकडीवरून अजित पवार संतप्त; म्हणाले, हुकूमशाही...

बेळगावातील मराठी नेत्यांच्या धरपकडीवरून अजित पवार संतप्त; म्हणाले, हुकूमशाही...

बेळगावात आज महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळावा आयोजित केला आहे. परंतु, या मेळाव्यात मराठी नेत्यांची धरपकडही करण्यात आली आहे. यावर अजित पवारांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

नागपूर : बेळगावात आज महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळावा आयोजित केला आहे. परंतु, या मेळाव्याला कर्नाटक पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तसेच, कर्नाटकात कलम १४४ लागू करण्यात आलं असून जमावबंदीचे आदेश देण्यात आलं आहेत. तसेच, मराठी नेत्यांची धरपकडही करण्यात आली आहे. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

अजित पवार म्हणाले की, कर्नाटकात महाराष्ट्र एकीकरण समितीची सभा आयोजित केली होती. महाराष्ट्र मुख्यमंत्री कर्नाटक मुख्यमंत्री आणि गृहमंत्री बैठक झाली. कोणालाही दोन्ही राज्यात जाताना अडवणार नाही असे ठरले होते. तरीही सकाळपासून धरपकड सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे आणि फडणवीस हजर होते. त्यांनी गृहमंत्र्यांना अधिवेशनात सांगावे. सध्या सीमाप्रश्न गंभीर आहे. लोकांना भडकवत आहेत हे महाराष्ट्राला समजायला हवे, कोणता पक्ष आहे हेही समजलं पाहिजे. जनतेला आणि सभागृहाला वाद निर्माण करणारे कोण आहे हे मुख्यमंत्री यांनी सांगावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सरकारचा धिक्कार करण्यासाठी आधी आंदोलन करून घोषणा दिल्या आहे. महाराष्ट्रातील जनतेला देशातील प्रत्येक ठिकाणी जाण्याची मुभा द्यायला हवी. हुकूमशाही कशी चालेल? अडवणूक कशी करता, हे बरोबर नाही. लोकशाहीत खपवून घेतले जाणार नाही. ज्यांनी अडवले त्यांच्यावर काय कारवाई होणार. मेळाव्याचे व्यासपीठ ताब्यात घेतले आहे. राजकीय यंत्रणा तुमच्या हातात चौकशी करा. समाजहिताचे विधेयक असेल त्याला कुणीही विरोध करणार नाही, असेही अजित पवारांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com