सुप्रिया सुळेंनी महाराष्ट्रात हेलपाटे मारण्यापेक्षा देशभर फिरून पक्ष वाढवावा; कोणी केली टीका?

सुप्रिया सुळेंनी महाराष्ट्रात हेलपाटे मारण्यापेक्षा देशभर फिरून पक्ष वाढवावा; कोणी केली टीका?

सुप्रिया सुळे या पंढरपूर दौऱ्यावर आल्या होत्या. या दौऱ्यावर अजित पवार गटातील नेत्याने जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

वसीम अत्तर | सोलापूर : सुप्रिया सुळेंनी महाराष्ट्रात हेलपाटे मारण्यापेक्षा देशभर फिरून पक्ष वाढवावा, असा सल्ला अजित पवार गटाचे नेते व प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिला आहे. सुप्रिया सुळे या पंढरपूर दौऱ्यावर आल्या होत्या. या दौऱ्यावर उमेश पाटील यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

सुप्रिया सुळेंनी महाराष्ट्रात हेलपाटे मारण्यापेक्षा देशभर फिरून पक्ष वाढवावा; कोणी केली टीका?
आक्रस्ताळे, लंपट जोकर, विदूषकी चाळे...; सुषमा अंधारेंचा चित्रा वाघांवर पलटवार

उमेश पाटली म्हणाले की, सुप्रिया सुळेंचा हिंदी आणि इंग्रजी भाषेवर चांगलं प्रभुत्व आहे. राष्ट्रवादी वाढवण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र राज्यात हेलपाटे मारू नये. हिंदी, इंग्रजी भाषेचा आधार घेत देशभरात राष्ट्रवादी वाढवण्यासाठी प्रयत्न करावा. सुप्रिया सुळें या वर्षातील 180 दिवस दिल्लीत असतात. त्यांना दिल्ली महानगरपालिकेत एक नगरसेवक निवडून आणता आला नाही. महाराष्ट्रात हेलपाटे मारण्यापेक्षा देशभर पक्षाचा प्रचार केला तर देशभरात राष्ट्रवादी खूप मोठा झाला असता, अशीही टीका त्यांनी केली आहे.

सुप्रिया सुळे या खासदार आहेत. शरद पवार यांच्यासारख्या नेत्याचा सुप्रिया सुळेंना पाठिंबा होता. इतका मोठा आणि उत्तुंग पाठिंबा असतांना सुप्रिया सुळे देशभरात पक्ष वाढवू शकले नाही. याची जबाबदारी झटकून चालणार नाही. कोण स्वीकारणार जबाबदारी, असा सवाल उमेश पाटील यांनी उपस्थित केला.

गोवा, मिझोराम, नागालँड, बिहार, उत्तर प्रदेशात अजित पवारांनी पक्ष वाढवायला पाहिजे होतं का? अजित दादा एकटे सक्षम होते महाराष्ट्र राज्य सांभाळायला. परंतु, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड यांना महाराष्ट्र राज्यात घुटमळत राहायचं होतं. म्हणून आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे, असेही उमेश पाटील यांनी म्हंटलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com