'2014 साली पंतप्रधान मोदींची डिग्री बघून निवडून दिले होते का?' अजित पवारांचा मित्र पक्षांना घरचा आहेर

'2014 साली पंतप्रधान मोदींची डिग्री बघून निवडून दिले होते का?' अजित पवारांचा मित्र पक्षांना घरचा आहेर

मागील काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीवरुन वाद निर्माण झाला आहे.

मुंबई : मागील काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीवरुन वाद निर्माण झाला आहे. विरोधकांनी पंतप्रधान मोदींच्या मास्टर्स शिक्षणाची पदवी बोगस असल्याचा दावा केला. यावरुन ठाकरे गटानेही आज सामनातून जोरदार टीका केली आहे. मात्र, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना मित्र पक्षांना घरचा आहेर दिला आहे. 2014 साली मोदींची डिग्री बघून लोकांनी निवडून दिले आहे का, डिग्रीवर काय आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

'2014 साली पंतप्रधान मोदींची डिग्री बघून निवडून दिले होते का?' अजित पवारांचा मित्र पक्षांना घरचा आहेर
'देवेंद्र फडणवीस महिलांवर प्रचंड फिदा झालेत' भाजप आमदार सुभाष देशमुख

छत्रपती संभाजीनगरमधील महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेला चांगला प्रतिसाद मिळाला असून 16 एप्रिलला नागपूर व 1 मे मुंबईला सभा होणार आहे. प्रत्येक पक्षाच्या दोन जणांना बोलण्याचे नियोजन होते, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

2014 साली पंतप्रधान मोदींची डिग्री बघून लोकांनी निवडून दिले आहे का? डिग्रीवर काय आहे? जे मुख्यमंत्री व पंतप्रधान झाले. त्यांच्या बहुमताचा आदर केला जातो. ज्यांचे बहुमत असते त्यांचा पंतप्रधान होतो. नऊ वर्ष ते देशाचे प्रतिनिधित्व करत आहेत. आता मध्येच त्यांची डिग्री काढले जाते. तो प्रश्न महत्वाचा नाही. महागाई, बेरोजगारी हे महत्वाचं विषय आहेत, असे त्यांनी सांगितले आहे.

तर, जाहिरातीवरील खर्चावरुन अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकार निशाणा साधला आहे. १०० कोटींवर जाहिरात खर्च जाईल. दुसरे मुद्दे राहिले नाही. लोकांसमोर काय घेऊन जायचे. एखादे प्रॉडक्ट विकायला जाहिरातबाजी करावी लागते. लोकांच्या पैशातून जाहिरातबाजी सुरू आहे. त्यांनी सरकारी योजनेची जाहिरात केली असती तर ठीक असते. आम्ही सरकारमध्ये असताना जाहिरातबाजी केली नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, पुणे खासदार पोटनिवडणुकीबाबत महविकास आघाडी एकत्र बसून निर्णय घेईल. एकोप्याने जागा लढवण्याबाबत निर्णय घेऊ. आज चंद्रकांत पाटील यांचा फोन आला की ७ तारखेला श्रद्धांजली सभा आहे, असेही अजित पवारांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com