2017, 2019मध्येही भाजपसोबत जायचा निर्णय  झाला होता; अजित पवारांनी सांगितला संपूर्ण इतिहास

2017, 2019मध्येही भाजपसोबत जायचा निर्णय झाला होता; अजित पवारांनी सांगितला संपूर्ण इतिहास

पहाटेच्या शपथविधीबाबत बोलताना आज अजित पवारांनी संपूर्ण इतिहासच सांगितला आहे.
Published on

मुंबई : पहाटेचा शपथविधी शरद पवार साहेबांच्याच आशीर्वादाने घेतला होता, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला आहे. पहाटेच्या शपथविधीबाबत बोलताना आज अजित पवारांनी संपूर्ण इतिहासच सांगितला आहे. राष्ट्रवादीने तब्बल तीन वेळा भाजपसोबत जायचं ठरवलं होते, असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. तसेच, नेहमी मलाच का व्हिलन केले जाते? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहे.

2017, 2019मध्येही भाजपसोबत जायचा निर्णय  झाला होता; अजित पवारांनी सांगितला संपूर्ण इतिहास
वय 82-83 झालंय, तुम्ही थांबणार आहात की नाही; अजित पवारांचा शरद पवारांना रिटायरमेंटचा सल्ला

सोनिया गांधी परदेशी असल्याचे पवारांनी सांगितले. 2004मध्ये आपले अधिक आमदार निवडून आले. 1999मध्ये मला 7 जिल्ह्यांचे खातं मिळालं. 2004मध्ये राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपद घेतले नाही. ती संधी मिळाली असती तर आजपर्यंत राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री राहिला असता, असे अजित पवारांनी म्हंटले आहे.

मी इतिहासांत जाणार नाही. पण साहेबांनी 1978 ला पुलोदचे सरकार स्थापन केले. पुलोदमध्ये जनसंघही सामील होता. नंतर आम्ही राजकारणात आलोत. पुढे सगळ्यांनी साथ दिली. इतिहास बघितला तर आपल्या देशातला करिश्मा असलेले नेतृत्व पाहिजे असतेच. 1977 मध्ये जनता पक्ष कुठे होता का? शोधावा लागत होता. प्रत्येकाचा एक काळ असतो. आपण वयाच्या 25 पासून 75 पर्यंत चांगले काम करू शकतो.

2017 ला वर्षा बंगल्यावर चर्चा झाली. मी महाराष्ट्राशी खोटे बोलणार नाही. आणि बोललो तर मी पवारांची औलाद नाही. खाते वाटप ठरलं होते. वरिष्ठ पातळीवर सगळे ठरले होते. परंतु, भाजपच्या वरिष्ठांनी बोलले होते की, शिवसेना जुना मित्र आहे. त्याला सोडणार नाही. आमचे वरिष्ठ नेते म्हणाले. ते चालणार नाही. शिवसेना जातीवादी आहे. त्यानंतर बोलणी फिस्कटली, असा गौप्यस्फोट त्यांनी केला.

त्यानंतर 2019च्या निवडणुकीनंतर एका उद्योगपतीच्या घरी पाच बैठका झाल्या. देवेंद्र बैठकीला होते.मला सांगितले बोलायचे नाही. मला कोणाला बदनाम होऊ द्यायचे नाही. मग मला सांगितले की आपण शिवसेनेबरोबर चाललो आहे. मला कळले नाही की 2017 ला शिवसेना जातीयवादी शिवसेना चालली नाही मग 2019 ला कशी चालली, असा सवालही अजित पवारांनी केला.

मी कोरोना काळातही हलगर्जीपणा दाखवला नाही. आम्ही वरिष्ठांना सांगितलेलं की काही तरी घडतंय. आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितले काही तरी चालले आहे. हसन मुश्रीफ साहेबांच्या कार्यालयात पत्र लिहिले सगळ्यांनी सह्या केल्या की साहेब आपण सत्तेत जायला पाहिजे. तोवर शिंदेंचा शपथविधी झाला नव्हता. मी खोटे बोलत नाही माझ्याकडे सगळ्या झेरॅाक्स आहेत, असेही त्यांनी सांगितले.

मला कोणाचाही अपमान करायचा नाही. मी अपमान सहन केला, माघार घेतली, माझ्यावर गुगली टाकली मी ती झेलली. मी खोटे का बोलू आपल्या घरच्यांची बदनामी का करायची, असेही त्यांनी म्हंटले आहे. प्रशासनावर माझी पकड आहे की नाही, महाराष्ट्र जाणतो. राष्ट्रवादी पक्ष वाढला पाहिजे माझं मत आहे. शरद पवारांच्या बैठकीला गेलेले आमदार माझ्या संर्पकात आहे, असाही खुलासा अजित पवारांनी केलाय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com